पार्लरला जाण्यासाठी वेळ नाहीये? मग १० मिनिटांमध्ये घराच्या घरी करा टोमॅटो फेशिअल
आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. या सणाला सगळीकडे मोठा उत्साह असतो. रक्षाबंधांच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटामध्ये राखी बांधते. सण म्हंटल की सर्वच महिला अतिशय नटून थटून तयार होतात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये पार्लरला जाण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम किंवा इतर गोष्टींचा वापर करतात. पार्लरमध्ये जाऊन ४ ते ५ तास महागड्या ट्रीटमेंट करून घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून त्वचा चमकदार आणि सुंदर करावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. टोमॅटोचा वापर केल्यामुळे त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसते. याशिवाय त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा.(फोटो सौजन्य – istock)
तारूण्यात वृद्ध दिसू लागला आहात? अहो, याला कारणीभूत ठरतायेत तुमच्या या 4 सवयी; वेळीच सावध व्हा!
टोमॅटो फेशिअल करण्यासाठी सर्वप्रथम, टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोमॅटोचे दोन तुकडे करून त्यावर थोडेसे मध टाकून एक ते दोन मिनिटं संपूर्ण त्वचेवर टोमॅटो चोळा. यामुळे त्वचा दीप कलिंग होईल आणि त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. मध त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यानंतर गरम पाण्याची वाफ घेऊन नाक आणि कपाळावर आलेले पिंपल्स क्लीन करून घ्या. त्यानंतर मध घातलेल्या टोमॅटोवर पिठी साखर आणि कॉफी पावडर घालून संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे उन्हामुळे वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा उठावदार दिसेल.
त्वचा स्क्रब करून झाल्यानंतर चेहऱ्यावर फेस पॅक लावणे आवश्यक आहे. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून बेसन, तांदळाचे पीठ आणि कोरफड जेल टाकून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांपर्यंत लावून ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. टोमॅटो फेशिअल केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. फेशिअल करून झाल्यानंतर मॉईश्चराईज लावणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा कायमच हायड्रेट आणि चमकदार दिसेल.
डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग होतील कायमचे दूर! काकडीचा वापर केल्यास त्वचेला होतील आश्चर्यकारक फायदे
टोमॅटो फेशियल करण्याचे फायदे:
टोमॅटो त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करतो.टोमॅटो मुरुमांवर उपचार करण्यासाठी आणि अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. टोमॅटो त्वचेवरील काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतो.
टोमॅटो लाल का दिसतो?
टोमॅटोला लाल रंग ‘लायकोपीन’ (lycopene) नावाच्या घटकामुळे टोमॅटोचा रंग लाल दिसतो.
टोमॅटोचे आरोग्यसाठी काय फायदे आहेत?
टोमॅटोमध्ये फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.