डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग होतील कायमचे दूर! काकडीचा वापर केल्यास त्वचेला होतील आश्चर्यकारक फायदे
सतत मोबाईलचा वापर, अपुरी झोप, अधिक वेळ टीव्ही किंवा स्किन पाहत बसणे इत्यादींमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय डोळ्यांखालील त्वचा अतिशय निस्तेज होऊन जाते. डोळ्यांखाली काळे डाग आल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. महागड्या क्रीम, स्किन केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र यामुळे काहीवेळा त्वचेला हानी पोहचते. त्वचा कोरडी होणे, लाल रॅश उठणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. अशावेळी कोणतेही घरगुती उपाय न करता काकडीचा वापर करावा. काकडीच्या वापरामुळे त्वचा कायमच हायड्रेट आणि निरोगी राहते. आज आम्ही तुम्हाला काकडीच्या वापरामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. काकडीच्या वापरामुळे त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
काकडीमध्ये विटामिन सी, कॅफीक एसिड आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय काकडी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. शरीरात वाढलेली जळजळ आणि ऍसिडिटी वाढल्यानंतर काकडीच्या रसाचे किंवा काकडीचे सेवन करावे. यामुळे शरीर सुधारण्यास मदत होईल. घरगुती उपाय केल्यामुळे शरीर आणि त्वचेला अनेक फायदे होतात.
सतत मोबाईल किंवा टीव्ही पाहत राहिल्यामुळे डोळ्यांभोवती काळे डाग येण्याची जास्त शक्यता असते. डोळ्यांना सूज आल्यानंतर चेहरा विचित्र दिसू लागतो. अशावेळी काकडीचे गोलाकार तुकडे करून डोळ्यांवर ठेवावे. यामुळे डोळ्यांभोवती आलेली सूज कमी होण्यास मदत होईल आणि डोळे कायमच उठावदार, सुंदर दिसतील.
डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये काकडीचा रस घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करून डोळ्यांभोवती लावावे. १० मिनिट ठेवल्यानंतर हलक्या हाताने डोळ्यांभोवती मसाज करून घ्या. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होतील आणि त्वचा अतिशय उठावदार दिसू लागेल.
काकडीचा वापर त्वचेवर वाढलेली सूज कमी करण्यासाठी करू शकता. यासाठी काकडीची साल काढून काकडीचे गोलाकार तुकडे करून घ्या. त्यानंतर १० ते १५ मिनिट काकडी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झालेली काकडी डोळ्यांवर ठेवून काहीवेळ आराम करा. हा उपाय नियमित केल्यास डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग आणि सूज कमी होण्यास मदत होईल. शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी काकडी अतिशय गुणकारी ठरेल.