दुपारच्या जेवणात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित जेवण जेवणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. दुपारच्या जेवणात शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. दुपारच्या वेळी पोटभर जेवल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात प्रामुख्याने शरीराला सहज पचन होतील अशाच पदार्थांचे सेवन करावे. दुपारच्या वेळी जेवलेले अन्नपदार्थ सहज पचतात. पण चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे, जडपणा किंवा थकवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पपईचे सेवन, शरीरात होतील सकारात्मक बदल
दुपारच्या जेवणात तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नये. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. तेलकट पदार्थ पचनास अतिशय जड असतात. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते. तेलकट पदार्थ खाल्यानंतर ते पचण्यास जड जातात. फास्टफूड, समोसे, भजी, तळलेले पराठे, कचोरी इत्यादी पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात तेल असते. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी सहज वाढू शकते. दुपारच्या वेळी तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील ऊर्जा वाढण्याऐवजी कमी होऊन जाते.
दुपारच्या जेवणात काहींना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र नेहमी नेहमी गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढत जाते आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. आहारामध्ये अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यास मधुमेह वाढू शकतो. याशिवाय आहारात खाल्लेल्या गोड पदार्थांमुळे लाघवीमधील आमलपित्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या जेवणात साखरेचे गोड पदार्थ न खाता फळांचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण दुपारच्या वेळी जेवणात अन्नपदार्थ खाल्यानंतर लगेच फळे खाऊ नयेत. यामुळे अन्नपदार्थ पचण्यास वेळ लागतात. फळे आणि जेवणातील पदार्थ एकत्र खाल्यामुळे शरीरात तात्काळ पचन होते, पण अन्नपदार्थ पचनास जास्तीचा वेळ लागतो. यामुळे गॅस, पोट फुगणे, अपचन इत्यादी समस्या उद्भवू लागतात.
तूप-त्रिफळा-आवळा… डॉक्तरांनी सांगितले मोतीबिंदूवर घरगुती उपाय; दीर्घकाळ टिकून राहील दृष्टी
दुपारच्या आहारात काहींना थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाण्याची सवय असते. मात्र या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम किंवा थंड ताक जेवल्यानंतर लगेच प्यायल्यास पचनक्रिया बिघडते आणि पोट दुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवू लागल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावे.