(फोटो सौजन्य: istock)
आजकालच्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांना कमी वेळातच अनेक आजार जडले आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक तणावामुळे हे आजार निर्माण होतात. यामध्ये डोळ्याशी संबंधित काही आजार देखील सामील आहेत, त्यातीलच एक प्रमुख समस्या म्हणजे मोतीबिंदू. पूर्वी हा आजार वृद्धापकाळात दिसत होता, मात्र आता तरुणांमध्येही हा आजार झपाट्याने वाढत आहे. वाढते प्रदूषण, मानसिक ताण, झोप न लागणे आणि असंतुलित आहार ही त्याची प्रमुख कारणे आहेत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मोतीबिंदूमध्ये, डोळ्यांच्या लेन्सची पारदर्शकता कमी होते, ज्यामुळे दृष्टी कमकुवत होते. तथापि, आयुर्वेदाने या समस्येपासून बचाव आणि उपचार करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय आहेत, जे नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत. आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकतो ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
मुलांच्या ‘या’ सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, बालपणीच सुधारल्या तर आयुष्यभर रहाल निरोगी
प्रदूषण आणि तणाव
वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि कोरडेपणा येतो, ज्यामुळे डोळ्यांच्या पेशी कमजोर होतात. याशिवाय मानसिक ताण आणि झोपेची कमतरता यांचाही डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनियमित झोप आणि अतिरिक्त ताण यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास मोतीबिंदूसारखी गंभीर समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत आयुर्वेदाची मदत घेणे खूप फायदेशीर ठरू शकते.
त्रिफळा
त्रिफळा चूर्ण हा एक लोकप्रिय आयुर्वेदिक उपाय आहे जो डोळ्यांचे आरोग्य राखण्यास आणि सुधारण्यास मदत करतो. त्रिफळा पाण्यात मिसळून याने डोळे धुतल्याने डोळे स्वच्छ होण्यास मदत होते आणि यामुळे डोळ्यांचा संसर्ग देखील टाळता येतो. हे डोळ्यांची सूज आणि जळजळ कमी करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.
गाईचे तूप
गाईच्या तुपाचा उपयोग आयुर्वेदात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो. शुध्द गाईच्या तुपाचे एक ते दोन थेंब डोळ्यात टाकल्याने डोळ्यांची आर्द्रता टिकून राहते. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा आणि जळजळ कमी होते. हा उपाय डोळ्यांना पोषण देतो आणि दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करतो.
घनदाट-लांबलचक केसांसाठी 5 रुपयांचा ‘हा’ पदार्थ ठरेल रामबाण, फक्त अशाप्रकारे करा वापर
आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सीचा प्रमुख स्रोत आहे, जो डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्याच्या नियमित सेवनाने डोळ्यांना पोषक तत्वांचा पुरवठा होतो आणि मोतीबिंदूपासून बचाव होतो. हे डोळ्यांच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते आणि दृष्टी स्पष्ट करते.
चुकूनही करू नका स्टिरॉइड्सचा वापर
तुम्ही स्टिरॉइड्सचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा आणि असे करणे टाळा. हे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो, कारण याचा वापर डोळ्यांच्या लेन्सवर परिणाम होऊ शकतो. स्टिरॉइड्सचा वापर टाळावा आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.