वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने करा पपईचे सेवन
लहान मुलांपासुन ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप आवडतात. आरोग्यासाठी फळे अतिशय पौष्टिक आहेत. फळांमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. दैनंदिन आहारात नियमित ताज्या आणि विटामिन सी असलेल्या फळांचे अधिक सेवन करावे. यामुळे बिघडलेली पचनक्रिया आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. वर्षाच्या बाराही महिने बाजारात उपलब्ध असणारे फळ म्हणजे पपई. चवीला गोड असलेला पपई आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पपईचे सेवन केल्यामुळे शरीराला पोषण मिळण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. आरोग्यासंबंधितगंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात पपईचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि याशिवाय अतिरिक्त चरबी जळून जाते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात पपईचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पपईचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित पपईचे सेवन करावे. पपईच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आतड्यांमध्ये साचून राहील घाण स्वच्छ होते. पपईमध्ये पेप्सिन आणि पॅपेन नावाचे पाचक एंझाइम्स आढळून येतात, ज्यामुळे अन्नपदार्थ सहज पचण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पपईचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने करा पपईचे सेवन
पपईचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा पपईचे सेवन करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. या आजारांची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात पपईचे सेवन करावे. कारण पपईमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. याशिवाय यामध्ये असलेल्या बेटा कॅरोटीन आणि विटामिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
महिलांसाठी दारूपेक्षाही घातक ठरतेय Sweet Drink, लिव्हरमध्ये खच्चून भरेल कॅन्सर ट्युमर; व्हा सावध
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला, पुरुष सतत काहींना काही करत असतात. पण प्रोटीन शेक पिण्याऐवजी नियमित पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. पपईमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते तर कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वाढलेल्या वजनासोबत शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी पपई खाणे फायदेशीर आहे.