
हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित प्या गरमागरम सूप
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडगार वातावरणात जास्त वेळ बाहेर फिरल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. हाड दुखणे, हातपाय दुखणे, कंबर दुखणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, सर्दी, खोकला, साथीचे आजार इत्यादी आजारांमुळे शरीर कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात कोणत्याही विकतच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टोमॅटो, मिक्स भाज्या आणि लसुणचा वापर करून गरमागरम सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सूप प्यायल्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. थंडीतील आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित सूप आणि शरीरात उष्णता टिकून राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे पौष्टिक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)