शेवगा हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेे. शेवग्याच्या शेंगा (Drumstick) आपल्याकडे अनेकजण आमटीमध्ये वापरतात, शेवग्यामुळे आमटीची चव तर वाढतेच शिवाय शेवगा आरोग्यासाठी उपयोगी आहे. शेवग्याच्या शेंगा व्यतिरिक्त आपण त्याच्या फुले आणि पानांबद्दल बोलायचे झाल्यास त्याचाही आरोग्यासाठी खूप फायदा होतो. शेवग्याच्या या पाणांची भाजी देखील केली जाते. जी शरिरासाठी अतिशय पोषक आहे. शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. शेवग्याची पाने आपल्याला कुठेही सहज सापडतील.
शेवग्याच्या पानांपासून बनवलेली पावडर तुम्ही कोणत्याही दुकानातून किंवा ऑनलाइन सहज मिळवू शकता. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या कोरड्या पावडरवर तुमचा विश्वास बसत नसेल, तर लहान हिरव्या पानांचा वापर करणे योग्य ठरेल.






