India's MPV Market Sales Nearly Double (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय Automobile Market मध्ये SUV कारची लोकप्रियता वाढत असतानाच MPV Market नेही मोठी झेप घेतली आहे. गेल्या 4 वर्षांत भारतातील MPV विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. विशेष म्हणजे, मारुती सुझुकी, टोयोटा आणि किया या 3 कंपन्यांनी या सेगमेंटवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. SIAM च्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2026 या H1 FY27 कालावधीत या 3 कंपन्यांनी मिळून जवळपास 2.39 लाख MPV विकल्या आहेत. हा एकूण विक्रीचा जवळपास 89 टक्के वाटा आहे.
4 वर्षांत MPV विक्रीत 88.5 टक्के वाढ!
आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतात 2.6 लाख MPV विकल्या गेल्या होत्या. आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा आकडा वाढून 4.9 लाख युनिट्सवर पोहोचला. म्हणजेच 4 वर्षांत 88.5 टक्क्यांची वाढ झाली. याच काळात संपूर्ण पॅसेंजर व्हेईकल मार्केटमध्ये 53.4 टक्के वाढ झाली. दुसरीकडे, SUV विक्रीत 117.1 टक्क्यांची वाढ झाली. MPV चा मार्केटमधील वाटा FY22 मधील 8.5 टक्क्यांवरून FY26 मध्ये 10.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मारुती सुझुकीची एर्टिगा सर्वात पुढे
MPV सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एर्टिगा सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. H1 FY27 मध्ये एर्टिगाच्या जवळपास 1.13 लाख युनिट्सची विक्री झाली. कंपनीच्या एक्सएल6च्या 20,389 आणि इन्व्हिक्टोच्या 1,635 युनिट्सचीही विक्री झाली. या तिन्ही मॉडेल्सची एकत्रित विक्री जवळपास 1.35 लाख युनिट्सवर पोहोचली.
टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉस आणि इनोव्हा क्रिस्टा या मॉडेल्सनी मिळून 54,234 युनिट्सची विक्री केली. तर रुमियनच्या 14,589 आणि वेलफायरच्या 685 युनिट्सची विक्री झाली. किया कॅरेन्स रेंजमधील कॅरेन्स, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्ही यांनी मिळून 34,284 युनिट्सची विक्री नोंदवली.
कुटुंबांसाठी MPV कारची वाढती पसंती
MPV कारमध्ये 6 ते 7 जणांना आरामात प्रवास करता येतो. मोठी जागा, आरामदायी सीट्स आणि सामान ठेवण्यासाठी मिळणारी जागा यामुळे कुटुंबांची या कारना पसंती मिळत आहे. मारुती एर्टिगामधील CNG ऑप्शनमुळेही तिची मागणी वाढली आहे. रेनॉ ट्रायबरने 10,719 तर निसान ग्रॅव्हाइटने 8,765 युनिट्सची विक्री केली. त्यामुळे SUV ची क्रेझ कायम असली तरी भारतीय कुटुंबांमध्ये MPV कारची मागणीही वेगाने वाढत असल्याचे दिसते.
Ans: आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतात 2.6 लाख MPV विकल्या गेल्या होत्या. आर्थिक वर्ष 2026 मध्ये हा आकडा 4.9 लाखांवर पोहोचला. यामध्ये 88.5 टक्क्यांची वाढ झाली.
Ans: मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे. H1 FY27 मध्ये तिच्या जवळपास 1.13 लाख युनिट्सची विक्री झाली.
Ans: मारुती सुझुकी, टोयोटा आणि किया या कंपन्यांनी मिळून जवळपास 2.39 लाख MPV विकल्या. हा या सेगमेंटच्या एकूण विक्रीचा जवळपास 89 टक्के वाटा होता.






