Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलींना पहिली दुसरीतच पाळी का येते? तज्त्रांनी केला खुलासा

सर्वसाधारण पाहायचं झालं तर मुलींना 10 ते 12 वर्षात पाळी यायला सुरुवात होते. मात्र आजकाल मुलींना खूप लवकर पाळी यायला सुरुवात झालेली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 19, 2025 | 05:55 PM
अल्पवयीन मुलींना पहिली दुसरीतच पाळी का येते? तज्त्रांनी केला खुलासा
Follow Us
Close
Follow Us:
  • अल्पवयीन मुलींना पहिली दुसरीतच पाळी का येते?
  • पालकांची याबाबत भुमिका कशी असावी ?
  • मासिक पाळी येण्याची कारणं काय ?
सर्वसाधारण पाहायचं झालं तर मुलींना 10 ते 12 वर्षात पाळी यायला सुरुवात होते. मात्र आजकाल मुलींना खूप लवकर पाळी यायला सुरुवात झालेली आहे. मुलींना पाळी (मासिक पाळी) लवकर येण्याची अनेक शारीरिक, आहाराशी आणि पर्यावरणाशी संबंधित कारणे असू शकतात. आजची बदललेली जीवनशैली हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

याची कारणं काय ?

मुलींची शारीरिक हालचाल कमी झाली असून मोबाईल, टीव्ही आणि संगणकाचा वापर वाढला आहे. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स लवकर सक्रिय होतात. यासोबतच आहारातील बदलही मोठी भूमिका बजावतात. फास्ट फूड, जंक फूड, जास्त साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण वाढते. हे हार्मोन पाळी सुरू होण्याच्या प्रक्रियेला गती देते.

दैनंदिन जीवनात होणारे बदल

वाढते वजन आणि लठ्ठपणाही पाळी लवकर येण्याचे एक कारण आहे. शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असेल तर त्या चरबीच्या पेशींमधून इस्ट्रोजेन तयार होते. त्यामुळे मासिक पाळीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होऊ शकते. काही वेळा हार्मोनल असंतुलन, थायरॉईडचे विकार किंवा जनुकीय कारणांमुळेही हा बदल दिसून येतो. आईला लवकर पाळी आली असल्यास मुलीलाही तशीच शक्यता असते.

पर्यावरणातील बदल, प्रदूषण, प्लास्टिकचा जास्त वापर आणि रसायनयुक्त अन्नपदार्थ हे घटकही शरीरातील हार्मोनल सिस्टीमवर परिणाम करतात. त्याचबरोबर अभ्यासाचा ताण, मानसिक दबाव, भीती, चिंता आणि अपुरी झोप यामुळेही हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. याबाबत गायनॅकोलॉजिस्ट नेहा गद्रे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

 पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका ‘हा’ जादुई पदार्थ, मधुमेह- वाढलेल्या वजनाची समस्या होईल कायमची गायब

 

 

पालकांनी यावर भूमिका काय असावी ?

अमुक तमुक या पॉडकास्टमध्ये डॉ. नेहा गद्रे यांनी मुलींना कमी वयात येणाऱ्या पाळीबाबत पालकांनी काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलं आहे.
मुलींना लवकर पाळी येण्याची कारणं म्हणजे सध्याच्या दैनंदिन जीवनातील होत असलेले बदल. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हार्मोनल असंतुलित होतात. अनेकदा डॉ. याचं कारण वाढणारं वजन असं देखील सांगतात. त्यामुळे वाढणाऱ्या वयातच कमी कॅलरीज असलेलं डाएट आणि खाण्यापिण्यावर आलेली बंधन यामुळे त्य़ांची वाढ आणि उंची देखील खुंटते.

या सगळ्याचा मुलींच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच त्यांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होतो. अशावेळी पालकांची भुमिका सर्वात महत्वाची असते. लहानपणापासूनच मुलींना सकस आणि पोषणयुक्त आहार महत्वाचा आहे. त्यामुळे मुलींना चांगला आहार कसा मिळेल याची सवय लागणं महत्वाचं आहे. कमी वयातच पाळी येणं आता खुप सामान्य़ होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलींशी संवाद चांगला ठेवणं तसंच त्यांना समजून घेणं त्यांना वेळ देणं देखील तितकंच महत्वाचं झालेलं आहे.

वाढते प्रदूषण, वाढता धोका! ही लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय ‘फुफ्फुसांचा कर्करोग’; वेळीच व्हा सावध!

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आजकाल मुलींना इतक्या लवकर पाळी का येते?

    Ans: बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढलेलं वजन, मानसिक ताण आणि पर्यावरणातील बदल ही यामागची प्रमुख कारणे आहेत.

  • Que: आहाराचा पाळी लवकर येण्याशी संबंध आहे का?

    Ans: होय. फास्ट फूड, जंक फूड, जास्त साखर, मैदा आणि तेलकट पदार्थांमुळे इस्ट्रोजेन हार्मोन वाढते, ज्यामुळे मासिक पाळी लवकर सुरू होते.

  • Que: वजन वाढल्यामुळे पाळी लवकर येऊ शकते का?

    Ans: . शरीरात जास्त चरबी असल्यास त्यातून इस्ट्रोजेन हार्मोन तयार होते. त्यामुळे पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकते.

Web Title: Early age periods what are the reasons why girls get their periods early

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • health
  • lifestyle news
  • period

संबंधित बातम्या

2 वर्षाच्या चिमुकल्याने नजरचुकीने केले ॲसिड सेवन, पुण्यातील तज्ज्ञांनी वाचवला जीव
1

2 वर्षाच्या चिमुकल्याने नजरचुकीने केले ॲसिड सेवन, पुण्यातील तज्ज्ञांनी वाचवला जीव

वाढते प्रदूषण, वाढता धोका! ही लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय ‘फुफ्फुसांचा कर्करोग’; वेळीच व्हा सावध!
2

वाढते प्रदूषण, वाढता धोका! ही लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय ‘फुफ्फुसांचा कर्करोग’; वेळीच व्हा सावध!

14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक
3

14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक

विना वॅक्सिंग चेहऱ्यावरील सर्व केस होतील दूर, काचेसारखी चमकेल त्वचा; फक्त या 3 गोष्टी पिठात मिसळा आणि कमाल बघा
4

विना वॅक्सिंग चेहऱ्यावरील सर्व केस होतील दूर, काचेसारखी चमकेल त्वचा; फक्त या 3 गोष्टी पिठात मिसळा आणि कमाल बघा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.