पोटावर वाढलेला चरबीचा थर होईल नष्ट! चहामध्ये टाका 'हा' जादुई पदा
लवंग खाण्याचे फायदे?
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?
लवंग चहा बनवण्याची कृती?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणामुळे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्याची तलप येते. आल्याचा चहा प्यायल्यामुळे घशाला सुद्धा शेक मिळतो आणि संपूर्ण शरीराला फायदे होतात. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. त्यामुळे सकाळी चहा बनवताना त्यात एक किंवा लवंग टाकावे. यामुळे चहाची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये लवंग घालून बनवलेल्या चहाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात लवंग घालून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
पचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लवंग अतिशय प्रभावी ठरते. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात पचनास जड किंवा तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे गॅस, अपचन, पोटदुखी आणि ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास होतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग चहाचे सेवन करावे. लवंगचे पाणी किंवा नुसताच लवंग सुद्धा चघळू शकता. वारंवार होणाऱ्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी लवंग खावी.
तोंडाच्या आरोग्यासाठी लवंग अतिशय प्रभावी ठरते.यामध्ये असलेले ‘युजेनॉल’ नावाचे एक नैसर्गिक घटक दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दातांमध्ये वाढलेल्या वेदना, कीड किंवा हिरड्यांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लवंग खावी. दातांमध्ये अतिशय तीव्र वेदना वाढू लागल्यास वेदना होत असलेल्या दाताला लवंग तेल लावावे. तसेच तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी जेवणानंतर लवंग चघळावा.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर काढा पिण्याऐवजी लवंग आणि इतर आयुर्वेदिक पदार्थ टाकून बनवलेल्या चहाचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. याशिवाय लवंगाचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यासोबतच मधुमेह नियंत्रणात राहतो.
चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात लवंग घालून व्यवस्थित उकळवा. तयार केलेला चहा गाळून कोमट झाल्यानंतर त्यात मध मिक्स करून प्यावा. यामुळे पोटातील घाण बाहेर पडून जाईल आणि वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.






