पोटाचा सुटलेला घेर कमी करण्यासाठी जेवणानंतर खा 'हा' पदार्थ
चुकीचा आहार, धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला ताण, आहारात सतत होणारे बदल, अपूरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचते. सतत चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक आहारात बदल करून वेगवेगळे डाएट फॉलो करतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. आहारात केलेला चुकीचा बदल आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे नेहमीच पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. पोटावर जमा झालेल्या चरबीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा वेगवेगळ्या ड्रिंकचे सेवन करतात. मात्र याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्यात का वाढतो डायरियाचा धोका? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या आरोग्याची काळजी, बिघणार नाही तब्येत
पोटावर चरबीचा घेर वाढल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जातो. शरीरावर अनावश्यक चरबी वाढल्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना जेवणानंतर कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाचे सेवन केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो आणि तुम्ही स्लिम दिसू लागता.
वजन कमी करताना जेवणानंतर बडीशेप, ओवा आणि जिऱ्याचे एकत्र सेवन करावे. याशिवाय या पदार्थांचे पाणी बनवून सुद्धा पिऊ शकता. हे तीन घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यासाठी सर्व साहित्य तव्यावर भाजून घ्या. त्यानंतर भाजून घेतलेले पदार्थ थंड करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर गरम पाण्यात मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात कमी होऊन जाईल. याशिवाय या चूर्णाच्या सेवनामुळे पोटात वाढलेली ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता नियंत्रणात राहील.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. सकाळी उठून कोमट पाण्यात लिंबूचा रस मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक सुद्धा बाहेर पडून जातील. दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याचे सेवन करून केल्यास संपूर्ण दिवस उत्साहात जातो. याशिवाय तुम्ही या पाण्यात हळद किंवा मध सुद्धा मिक्स करू शकता.
किडनीला हळूहळू पोखरून काढतात या 5 वाईट सवयी; आजपासून थांबवा नाहीतर महागात पडेल
शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय कोमट पाण्याचे सेवन केल्यास पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. याशिवाय नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे शरीरातील हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी नियमित शांत झोप घ्यावी.
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
फळे, भाज्या, पातळ प्रथिने (b.lean protein), संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबी (healthy fats) यांचे सेवन वाढवा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि चरबीयुक्त पदार्थ कमी खा.भरपूर पाणी प्या
वजन कमी करण्यासाठी किती कॅलरी कमी कराव्यात?
तुम्ही दररोज किती कॅलरी वापरता आणि किती बर्न करता यावर अवलंबून असते. साधारणतः, दररोज 500 कॅलरीज कमी केल्याने आठवड्यातून 1 पौंड वजन कमी होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या, आपल्या शरीराची गरज ओळखा, नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा