(फोटो सौजन्य: istock)
किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्तातील कचरा आणि विषारी पदार्थ काढून टाकून शरीराचे कार्य सुरळीत ठेवते. हा अवयव आपल्या शरीराच्या आत असला तरी याची योग्य काळजी न राखल्यास आपण अनेक समस्यांना आमंत्रण देत असतो. अनेकदा आपल्या नकळत आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्या आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी घातक ठरत असतात. आपल्या सवयी किडनीला सडवण्याचे काम करत असते. अशात आज आम्ही तुम्हाला आपल्या रोजच्या जीवनातील काही अशाच सवयींविषयी माहिती सांगत आहोत ज्या वेळीच रोखल्या नाही तर तुम्ही तुमच्या अडचणी वाढवू शकता. यामुळे किडनीला गंभीर नुकसान होऊ शकते त्यामुळे वेळीच या सवयी रोखून तुम्ही तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारू शकता. चला या कोणत्या वाईट सवयी आहेत ते जाणून घेऊया.
युरीन इन्फेक्शनमुळे त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, जळजळ-वेदना होतील दूर
कमी पाणी पिणे
आपल्या शरीराला ७८% पाण्याची गरज असते, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात शक्य तितक्या जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करायला हवे. योग्य प्रमाणात पाणी न पिणे ही किडनीसाठी सर्वात हानिकारक सवयींपैकी एक आहे. पाण्याअभावी लघवी जाड होते, ज्यामुळे किडनी स्टोन किंवा किडनी इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळापर्यंत डिहायड्रेशनमुळे किडनीची कार्यक्षमता कमकुवत होऊ शकते. त्यामुळे दररोज किमान २-३ लिटर पाणी पिणे गरजेचे असते.
जास्त वेदनाशामक औषध घेणे
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्ज (NSAIDs) चा सतत वापर केल्याने किडनीला नुकसान होऊ शकते. वेदना, दाह किंवा ताप, जळजळ कमी करण्यासाठी बऱ्याचदा याचा वापर केला जातो मात्र ही औषधे किडनीत रक्त प्रवाह कमी करू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन किडनीच्या आजाराचा धोका वाढत असतो.
धूम्रपान आणि मद्यपान
आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की, धुम्रपान आणि मद्यधूम्रपानामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो, तर अल्कोहोलमुळे निर्जलीकरण होते आणि मूत्रपिंडांवर दबाव येतो.पान आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरत असते. याचे सेवन आपल्या किडनीला खराब करत असते. हे किडनीच्या कार्यावर परिणाम करते. धूम्रपानामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो, तर मद्यपानामुळे निर्जलीकरण होते आणि मूत्रपिंडांवर दबाव येतो.
रक्तदाब आणि मधुमेह
हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज हे किडनीचे मोठे शत्रू आहेत. या आजारांवर वेळीच उपचार केले नाहीत तर किडनीच्या नसांना नुकसान पोहचू शकते. यामुळे किडनी निकामी पडण्याचा धोका वाढतो. नियमित तपासणी आणि आवश्यक औषधे वेळेवर घेऊन तुम्ही या आजारापासून आराम मिळवू शकता.
जास्त मीठ आणि प्रोसेस फूडचे सेवन
जास्त मिठाचे सेवन आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन आपल्या किडनीला नुकसान पोहचवत असते. हे रक्तदाब वाढवते, ज्यामुळे किडनीला जास्त काम करावे लागते. प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये असलेले रसायने देखील किडनीसाठी घातक ठरत असतात.
किडनी खराब झाल्यास काय त्रास होतो?
वारंवार लघवी होणे, श्वास घेण्यास त्रास, भूक न लागणे, मळमळ आणि उलटी, स्नायूंमध्ये तीव्र वेदना
किडनी स्टोनची लक्षणे काय आहेत?
सतत मळमळ आणि उलट्या होणे ही किडनी स्टोनची सामान्य लक्षणे आहेत.
किडनी चांगली आहे की नाही हे कसे ओळखावे?
तुमचे मूत्रपिंड चांगले कार्य करत असल्याची चिन्हे – तुम्हाला सामान्य लघवी होते. तुम्हाला फिकट पिवळे मूत्र आहे. पाणी टिकून राहिल्याने तुम्हाला सूज किंवा फुगीरपणा नाही.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.