वजन कमी करण्यासाठी या मिश्रणाचे करा सेवन
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींवर होणारे परिणाम, अपुरी झोप, आहारात होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, जंक फूडचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरावर वाढलेली वाढलेली अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वाढलेले वजन संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आहारात प्रोटीनशेक इत्यादी पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
खुलून हसाल तेव्हाच तर आनंदाने जगाल, जाणून घ्या laughter Therapy चे फायदे
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लवंग आणि मधाचे एकत्र सेवन करून शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करावी. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि थर्मोजेनिक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात लवंगाचे सेवन करावे. मधाचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. म्हणूनच वाढलेले वजन कमी करण्यासाठी मध आणि लवंगचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी लवंग आणि मधाचे सेवन कसे करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरावर अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. शरीरावर वाढलेल्या चरबीमुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लवंग आणि मधाचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो.
फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे अनेकी लोक त्रस्त आहेत. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरवर अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते. ज्यामुळे लिव्हरचे कार्य बिघडते. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी उपाशी पोटी लवंग आणि मधाच्या चाटणाचे सेवन करावे. यामुळे लिव्हर डिटॉक्स होऊन लिव्हर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांनी करू नका 4 तेलांचे सेवन, हृदयांच्या नसांमध्ये त्वरीत भरेल रक्त
थंडीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी वाढलेल्या आजारामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लवंग आणि मधाच्या मिश्रणाचे सेवन करावे. ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.