हसणे कोणाला नाही आवडत. पण आज नैराश्याच्या गर्दीत आपण हसणेच विसरत जात आहोत. म्हणूनच अनेक तज्ञांकडून लाफ्टर थेरपीचा उपयोग केला जातो. ही एक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. हसण्यामुळे मानसिक ताण कमी होतो, चिंता कमी होते, आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते. यामुळे रुग्णांच्या आयुष्यात एक नवी जगणाच्या पालवी फुटते. चला लाफ्टर थेरपीचे फायदे जाणून घेऊया.
लाफ्टर थेरपीचे फायदे (फोटो सौजन्य: iStock)
मानसिक ताण कमी होतो: आपण सर्वेच जाणतो हसण्याने ताण आणि चिंता कमी होतात, कारण जेव्हा आपण हसतो तेव्हा शरीरातील एंडोर्फिन्स (सुख हार्मोन) बाहेर पडतात, ज्यामुळे आपल्याला आनंदी वाटते.
हृदयाचे आरोग्य सुधारते: हसण्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाच्या कार्यप्रणालीवर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
वेदना कमी होते: वर नमूद केल्याप्रमाणे हसल्याने शरीरात एंडोर्फिन (सुखद हार्मोन) चे उत्पादन वाढते, ज्यामुळे वेदना कमी होतात.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते: हसणे शरीरातील रोग प्रतिकारशक्तीला वाढवते, ज्यामुळे आपल्याला विविध रोगांपासून लांब राहता येते.यामुळे आपल्याला एक उत्तम आरोग्य लाभते.
सामाजिक संबंध सुधारतात: हसणे आपल्याला दुसऱ्या लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यात मदत करते, ज्यामुळे सामाजिक संबंध आणि आनंद वाढतो.