अॅसिडीटीवर रामबाण उपाय
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अवेळी जेवणे, अपुरी झोप इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे रोजच्या आहारात संतुलित आणि सकस अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. अनेकदा घाईगडबडीमध्ये रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी जेवणास उशीर होऊन जातो. उशिरा जेवल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पोटासंबंधित समस्या आणि इतर आजार होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन, २ दिवसांमध्ये खोकला होईल कमी
अॅसिडीटी झाल्यानंतर शरीरातील विषारी पदार्थ पोटामध्ये तसेच साचून राहतात. ज्यामुळे पोटात दुखणे, आंबट ढेकर येणे, पचनक्रिया बिघडणे, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र तरीसुद्धा बरे वाटत नाही. अशावेळी गोळ्या औषध खाण्यापेक्षा घरगुती उपाय करून पहावे, ज्यामुळे अॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या फळाचे नियमित सेवन करावे, जाणून घेऊया.
अॅसिडीटी झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी केळ्याचे सेवन करावे. केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदामध्ये अॅसिडीटी झाल्यानंतर केळी खाल्यास अॅसिडीटीपासून आराम मिळतो. या फळामध्ये असलेले गुणधर्म आम्ल कमी करण्यास मदत करते. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. केळी खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते. अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांवर आराम मिळवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर 2 केळी खावीत.
सकाळी उठल्यानंतर नियमित दोन केळ्यांचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. केळ्याचे सेवन तुम्ही दूध किंवा दह्यासोबत करू शकता. केळ्यांपासून सॅलडसुद्धा बनवता येते.
हे देखील वाचा: चहा पिण्याने होतोय त्रास, तर 20 मिनिट्स आधी खा असे बदाम
तेलकट किंवा तिखट अन्नपदार्थ खाऊन अॅसिडीटी झाल्यानंतर आहारात थंड आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच कोमट पाण्यात जिरे टाकून ३ तास ठेवून त्यानंतर जिऱ्याचे पाणी प्यावे. अॅसिडीटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी रोज एक नारळ पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच आरोग्य चांगले राहण्याससुद्धा मदत होते.अॅसिडीटी होऊ नये म्हणून आहारात तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांचे सेवन केल्यास अॅसिडीटी वाढू लागते आणि आरोग्य बिघडते.