कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
देशभरात सगळीकडे दिवाळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात पार पडला. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात.फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटत नाही. पण दिवाळीमध्ये फोडले जाणारे हेच फटाके आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. फटाक्यांच्या धुरामुळे आणि फटाक्यांच्या आवाजामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. प्रदूषण वाढल्यामुळे हवेची गुणवत्ता पूर्णपणे खराब झाली आहे. वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक गंभीर समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
हे देखील वाचा: घरच्या घरी पपई लावण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
दिवाळीमध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना सर्दी, खोकला, अस्थमा, श्वसनाचे आजार आणि इतर आजारांची लागण झाली आहे. सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर सतत खोकून छातीमध्ये आणि डोकं दुखण्यास सुरुवात होते. शिवाय कोरडा खोकला लवकर बरा होत नाही. कोरडा खोकला झाल्यानंतर रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात खोकला येण्यास सुरुवात होते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: किडनी निकामी झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही 4 लक्षणं