सध्या सगळीकडे आंब्याचा रिझन चालू आहे. बाजारात काही प्रमाणात आंबे उपलब्ध झाले आहेत. एप्रिल मे महिना चालू झाला की सगळ्यांना आंब्यांची आठवण येते. फळांचे राजा म्हणून सगळीकडे आंबा प्रसिद्ध आहे. कोकणातील हापूस आंब्यांना सगळीकडे मोठी मागणी आहे.भारतासह विदेशातही आंब्यांना मोठी मागणी आहे.आंबा चवीलाच गोड नसून शरीरासाठी देखील आरोग्यदायी आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते डोळ्यांचे आरोग्य सुधरण्यापर्यंत आंब्यामध्ये सगळे गुणकारी घटक आढळून येतात.
आंब्याचे सेवन केल्याने शरीराला काय फायदे होतात?
प्रतिकारशक्ती वाढते
आंब्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे शरीराला संसर्ग आणि रोगापासून वाचवण्यास मदत होते. आंब्यामध्ये बीटा-कॅरोटीन असते. यामुळे शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. व्हिटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. आंब्याचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.तसेच मॅक्युलर डीजेनरेशनपासून संरक्षण करण्यास आंबा मदत करतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते
आंब्यामध्ये पोटॅशियम आढळून येते. त्यामुळे आंबा हा हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण खनिज आहे. पोटॅशियम असल्याने रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकार टाळला जाऊ शकतो. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी लागते. आंब्यामध्ये भरपूर फायबर असते. यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.आंबा खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास आणि बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आंब्याचे सेवन चांगले असते.
स्मरणशक्ती वाढवते
आंब्याचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदे होतात. ज्या व्यक्तींना स्मृतीभ्रंश असेल अश्यानी आंब्याचे सेवन केले पाहिजे. यामध्ये आढळणारे ग्लूटामाईन ऍसिड नावाचे तत्व स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. तसेच रक्तपेशीही सक्रिय करतात. यामुळे गर्भवती महिलांना आंबा खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर किंवा चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यामध्ये अनेक सुधारणा दिसून येतात. तसेच व्हिटॅमिन सीमुळे संसर्गापासून बचाव होण्यास मदत होते.






