
भात खाऊन अजिबात वाढणार नाही पोटावर चरबीचा घेर! रोजच्या जेवणात 'या' खास पद्धतीने शिजवा भात
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर सकाळचा नाश्ता करणे टाळले जाते. बाजारात उपलब्ध असलेले महागडे सप्लिमेंट्स, महागडे डाएट, प्रोटीन ड्रिंक, फास्टिंग इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होत नाही. कायमच निरोगी आणि मजबूत राहण्यासाठी आहारात अनेक बदल केले जातात. जेवणात भात किंवा भातापासून बनवलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन केले जात नाही. पण असे केल्यामुळे शारीरात कोणतेही मोठे बदल दिसून येत नाही. भात खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि तुम्ही कायमच निरोगी राहता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय लोकांचे फिटनेस रहस्य? वजन वाढू नये म्हणून कशा पद्धतीने भात शिजवावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
दक्षिण भारतात तांदळापासून असंख्य पदार्थ बनवले जातात. इडली, डोसा, उत्तपम इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय साऊथ इंडियन लोकांच्या आहारात प्रामुख्याने भातच असतो. भाताशिवाय जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. दक्षिण भारतीय लोक भात शिजवताना त्यातील पाणी काढून टाकतात. या पाण्यात भातामधील जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जातात. भातातील ग्लुकोज आणि कॅलरी कमी झाल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. या पद्धतीने शिजवलेला भात चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागतो. भातामधील पाणी काढून टाकल्यामुळे रक्तातील साखरेचा स्तरही अचानक वाढवत नाही. तसेच तुम्ही जेवणात कितीही भात खाल्ला तरी तुमचे वजन अजिबात वाढणार नाही.
दक्षिण भारतीय लोक आहारात पॉलिश न केलेला, जाड किंवा लाल तांदूळ वापरतात. लाल तांदळाना उकडे तांदूळ असे सुद्धा म्हणतात. लाल तांदळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबर युक्त अन्नपदार्थांचे आहारात सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लाल तांदळाच्या भाताचे सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. तसेच यामध्ये पोषक खनिजे आणि जीवनसत्वं जास्त प्रमाणात आढळून येतात. लाल तांदुळाचा भात खाल्ल्यामुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.
दक्षिण भारतात थाळीमध्ये केवळ भाताचं नाहीतर रस्सम, सांबार, विविध भाज्या, डाळी इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ सहज पचन होतात. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य कायमच निरोगी राहते. फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असलेले पदार्थ रोजच्या आहारात नेहमीच खावेत. भात खाल्यामुळे शरीराला दीर्घकाळासाठी ऊर्जा मिळते. जेवण बनवताना कमीत कमी तेलाचा वापर करावा. कमी तेल टाकून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. हळद, आलं, मोहरी, कढीपत्ता, लसूण इत्यादी पदार्थांचा वापर करून दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.
Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण
वजन कसे कमी करावे?
भरपूर भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि जास्त चरबी असलेले पदार्थ टाळा.
वजन कधी आणि कसे मोजावे?
सकाळी शौचानंतर आणि काहीही खाण्यापिण्यापूर्वी वजन करणे सर्वात योग्य आहे, कारण या वेळी शरीराचे वजन सर्वात स्थिर असते.
मधुमेह म्हणजे काय?
इन्सुलिन हे स्वादुपिंडाद्वारे तयार होणारे एक संप्रेरक आहे, जे ग्लुकोजला पेशींमध्ये उर्जेसाठी वापरण्यास मदत करते. मधुमेहात, एकतर पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही.