Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या आहारात सुरण खाल्यामुळे आरोग्याला होतात चमत्कारीत फायदे, मूळव्याधीची समस्या होईल दूर

सुरण खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनची कार्यक्षमता, सुधारण्यासाठी मधुमेहींनी सुरणाचे सेवन आवर्जून करावे. जाणून घ्या सुरण खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2025 | 01:50 PM
रोजच्या आहारात सुरण खाल्यामुळे आरोग्याला होतात चमत्कारीत फायदे

रोजच्या आहारात सुरण खाल्यामुळे आरोग्याला होतात चमत्कारीत फायदे

Follow Us
Follow Us:

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे आणि कंदमुळांचे सेवन करणे आवश्यक आहे. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. आरोग्यासाठी कंदमूळ अतिशय गुणकारी ठरते. त्यात प्रामुख्याने सुरणाच्या भाजीचे सेवन केले जाते. सुरणाच्या कांद्यापासून भाजी, भजी आणि सुरण फ्राय इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र आपल्यातील अनेकांना सुरण खायला आवडत नाही. पण आहारात कधीतरी सुरणाच्या भाजीचे सेवन करावे. यामध्ये कॅल्शियम, तांबे, जस्त, सेलेनियम, लोह, फॉस्फरस, लोह, मँगनीज आणि यांसारख्या आवश्यक खनिजे आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुरण खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

लघवीमधून रक्त येणे? प्रेमानंद महाराज ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त, लाखोमधील एका व्यक्तीला होता भयानक आजार

सुरण हे एक पौष्टिक कंदमूळ असून ते केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदात सुरणाला विशेष महत्त्व आहे. कारण, त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. सुरणामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंटस्, सी व बी ६ ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह भरपूर प्रमाणात असतात. सुरणामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. यातील नैसर्गिक प्रोबायोटिक्समुळे गॅस, अपचन आणि ऍसिडिटी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

आयुर्वेदानुसार सुरण हा रक्तशुद्धीकारक आहे. तो पुरळ आणि त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यास मदत करतो. सुरणाच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तो मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून इन्सुलिनची कार्यक्षमता, सुधारण्यासाठी मधुमेहींनी सुरणाचे सेवन आवर्जून करावे. सुरणामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे तो रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारतो. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासही सुरण लाभदायक ठरतो. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटस्मुळे फ्री रॅडिकल्सचा नाश होतो आणि कर्करोगापासून संरक्षण मिळते.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार? ऍलर्जी होण्याचे प्रकार आणि कारणे कोणती? जाणून घ्या उपचार

सुरण खाण्यामुळे लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि अन्नाचे अतिरेकी सेवन टाळले जाते. त्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अर्थात, सुरण कच्चा खाणे टाळावे. तो वाफवून, उकडून किंवा भाजून खाणे अधिक चांगले. सुरणाची भाजी, भरीत किंवा सुरणाचे वडे हे चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहेत. काही लोकांना सुरणामुळे ऍलर्जी किंवा घशात खवखव होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Eating suran in your daily diet has miraculous health benefits the problem of hemorrhoids will go away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • helathy lifestyle

संबंधित बातम्या

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
1

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर ‘या’ शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश, राहाल कायमच हेल्दी
2

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर ‘या’ शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश, राहाल कायमच हेल्दी

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
3

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
4

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.