प्रेमानंद महाराज 'या' गंभीर आजाराने त्रस्त
जगभरात सगळीकडे वृंदावनचे रहिवासी संत प्रेमानंद महाराज प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद महाराज हे राधावल्लभ पंथाचे हिंदू गुरू आहेत. त्यांना भेटण्यासाठी लाखोंच्या संख्येने त्यांचे भक्त वृंदावनमध्ये येतात. याशिवाय त्यांच्या भेटीसाठी अनेक लोक आश्रमाबाहेर रांगा लावतात. तसेच प्रेमानंद महाराज त्यांच्या आश्रमात जाण्यासाठी नेहमी पायी प्रवास करतात. त्यांच्या आश्रमाचे नाव ‘राधाकेली कुंज’ असे आहे. महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीच कायम हास्य असतं. त्यांच्या विचारांनी जगभरातील अनेक लोक कायम प्रेरित होतात. मात्र मागील काही दिवसांपासून प्रेमानंद महाराज किडनीसंबंधित गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या गंभीर आजारामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
प्रेमानंद महाराजांनी जगभरातील अनेकांना जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवली आहे. जगभरात त्यांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांना मागील 18 वर्षांपासून किडनीच्या आजाराची लागण झाली आहे. आज आम्ही तुम्हाला प्रेमानंद महाराज कोणत्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत? या आजाराची शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरातील दोन्ही किडन्या निकामी होण्याचिं शक्यता असते.
पॉलीसिस्टिक किडनी या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. उच्च रक्तदाब, पाठीच्या कण्यात वाढणाऱ्या वेदना, लघवीमधून रक्त येणे, किडनी स्टोन इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. सुरुवातीच्या काळात या आजाराची लक्षणे अतिशय सौम्य दिसून येतात. मात्र कालांतराने शरीरात गंभीर समस्या उद्भवू लागतात. पोटदुखी, थकवा आणि तहान किंवा वारंवार लघवी होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात.
उन्हाळ्यात आवडीने प्यायला जाणारा ऊसाचा रस आरोग्यासाठी ठरेल घातक, उद्भवतील ‘या’ भयानक समस्या
पॉलीसिस्टीक किडनी हा आजार आनुवंशिकतेमुळे सुद्धा होण्याची शक्यता असते. या आजाराचे निदान करताना सगळ्यात आधी कुटुंबाचा इतिहास तपासाला जातो. याबरोबरच शारीरिक तपासणी, इमेजिंग टेस्ट (अल्ट्रासाऊंड), एमआरआय, सीटी स्कॅन आणि अनुवांशिक चाचणी इत्यादी चाचण्या केल्या जातात. या चाचण्या केल्यानंतर या गंभीर आजाराचे निदान होते.