Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eggs Quality Check: अंड ताजे आहे की खराब? न फोडता कसं ओळखायचं? करा ‘ही’ सोपी टेस्ट, क्षणात मिळेल उत्तर

Tips To Check Eggs Freshness: अनेकदा घरात साठवलेली अंडी ताजी आहेत की खराब, हे अनेकदा डोळ्यांनी ओळखणे कठीण जाते. तज्ज्ञांच्या मते, अंड न फोडताही त्याची ताजेपणा तपासण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी ट्रिक वापरता येते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 17, 2026 | 06:42 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • अंड फोडायची गरज नाही
  • करा ‘हा’ सोपा टेस्ट
  • क्षणात कळेल ताजे की खराब
अंड हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते आणि अनेकांच्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, घरात काही दिवस ठेवलेली अंडी ताजी आहेत की खराब झाली आहेत, हे ओळखणे अनेकदा कठीण जाते. बहुतेकजण अंडे फोडल्यानंतरच त्याची गुणवत्ता तपासतात. अनेकदा अंड्याच्या कार्टनवरील तारीख नेहमीच अंडी किती ताजी आहेत हे दर्शवत नाही. कधीकधी ती फक्त पॅकेजिंगची तारीख असते, तर काही प्रकरणांमध्ये ‘Best Before तारीख’ दिलेली असते. जर तुम्ही अंडी थेट कार्टनमधून काढून साठवली असतील किंवा फार्ममधून विकत घेतली असतील, तर अंडी ताजी आहेत की खराब हे ओळखता येत नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते, अंड न फोडताही त्याची ताजेपणा सहज तपासता येते. यासाठी ही सोपी ट्रिक वापरुन पाहा, जाणून घ्या.

Hair Care Tips: केस खूप गळतात? ‘या’ पोषक तत्वांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नका; ठरू शकते धोकादायक

फ्लोट टेस्ट

अंड्याचा ताजेपणा तपासण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे ‘फ्लोट टेस्ट’. यासाठी एका भांड्यात थंड पाणी भरावे आणि त्यात अंडे अलगद सोडावे. जर अंडे थेट तळाशी जाऊन आडवे पडले, तर ते पूर्णपणे ताजे असल्याचे समजावे. अंडे तळाशी गेले पण उभे राहिले किंवा किंचित तिरके दिसले, तर ते काही दिवस जुने असले तरी खाण्यासाठी सुरक्षित असते. मात्र अंडे पाण्यावर तरंगू लागले, तर ते वापरणे टाळावे. असे अंडे खूप जुने असण्याची आणि खराब झाल्याची शक्यता अधिक असते.

अंड का तरंगते ?

जास्त वेळ अंडी ठेवल्यानंतर, अंड्याच्या कवचात अतिशय सूक्ष्म छिद्रे होतात. कालांतराने या छिद्रांमधून हवा आत प्रवेश करते आणि अंड्यातील हवेचा फुगा मोठा होत जातो. त्यामुळे जुनी अंडी हलकी होतात आणि पाण्यावर तरंगतात, तर ताजी अंडी अधिक घनतेमुळे तळाशी बुडतात.

अंडे फोडल्यानंतरही ओळखता येते गुणवत्ता

जर अंड आधीच फोडले असेल, तर त्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग पाहूनही ताजेपणा समजू शकतो. ताज्या अंड्याचा पांढरा भाग घट्ट असतो आणि पिवळा भाग गोलाकार व उंच दिसतो. जुने अंडे मात्र पातळ आणि पाण्यासारखे दिसते. तसेच कुजलेल्या अंड्यातून सल्फरसारखा तीव्र वास येतो. असा वास आल्यास अंड त्वरित फेकून द्यावे.

अंडी नेहमी त्यांच्या मूळ बॉक्समध्येच फ्रिजमध्ये ठेवावीत. योग्य साठवणुकीमुळे अंड्यांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते. त्यामुळे पुढच्या वेळी अंडे वापरण्यापूर्वी हा सोपा पाण्याचा प्रयोग करून त्याची ताजेपणा तपासणे अधिक सुरक्षित ठरेल.

जसलोक हॉस्पिटलची कमाल! कोणतीही शस्त्रक्रिया न करता ‘रोबोटिक’ पद्धतीने कर्करोगावर मात

Web Title: Egg freshness test water float method how to check fresh or rotten eggs at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Egg
  • egg recipe
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
1

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
2

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
3

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
4

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.