
नाश्त्यात Eggs खाताय तर व्हा सावध! FSSAI ने जारी केला अलर्ट; अंड्यात आढळले कॅंसर जन्माला घालणारे धोकादायक तत्व
वाद कसला?
यादरम्यान आता एग्गोज या लोकप्रिय अंडी ब्रँड संबंधात वाद निर्माण झाला आहे. एका ऑनलाइन अहवालात अंड्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि त्यात नायट्रोफुरंटोइनचे अंश असू शकतात अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. यामुळे सोशल मीडियावर आणि जनतेमध्ये वादविवाद सुरू झाला आणि नियामक संस्थांचे लक्ष याकडे वेधले गेले. नायट्रोफुरंटोइन हा अँटीबायोटिक्सचा एक गट आहे जो प्राण्यांच्या अन्नात वापरण्यास सक्त मनाई आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की जर ही औषधे कुक्कुटपालनात बेकायदेशीरपणे वापरली गेली तर त्यांचे अवशेष अंड्यांमध्ये जाऊ शकतात. म्हणूनच FSSAI ने देशभरात नमुने आणि चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
नायट्रोफुरंटोइन अंड्यात आढळल्याने कोणते दुष्परिणाम होतात?
या वादावर प्रतिक्रिया देताना एग्गोसने आपल्या अंड्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड नसल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या अंड्यांची तपासणी करण्यात आली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रयोगशाळेचा तपशीलवार अहवाल कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सार्वजनिक केला असल्याचेही सांगण्यात आले आहे. एग्गोसचा दावा आहे की चाचणीदरम्यान त्यांच्या अंड्यांमध्ये कोणतेही बंदी घातलेले अँटीबायोटिक्स, कीटकनाशके किंवा औषधी घटक आढळलेले नाहीत.
आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
टीओआयच्या अहवालानुसार, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे की ही समस्या एखाद्या एका ब्रँडपुरती मर्यादित नाही. पोल्ट्री क्षेत्रात अँटीबायोटिक्सचा गैरवापर ही एक व्यापक आणि गंभीर समस्या आहे. सर गंगाराम रुग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे अध्यक्ष प्रा. चिंतामणी यांनी सांगितले की नायट्रोफुरंटोइन या औषधावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे, कारण त्याचे अवशेष अंडी शिजवल्यानंतरही नष्ट होत नाहीत. प्राण्यांवर केलेल्या संशोधनात अशा अंड्यांचे दीर्घकाळ सेवन केल्यास अनुवांशिक हानी, कर्करोगाचा धोका तसेच किडनी आणि लिव्हरच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे निदर्शनास आले आहे.