Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! आहारात करा ‘या’ फायबर युक्त पदार्थांचा समावेश, हृदयाला मिळेल पोषण

शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका टळतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 07:56 AM
नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! आहारात करा 'या' फायबर युक्त पदार्थांचा समावेश, हृदयाला मिळेल पोषण

नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! आहारात करा 'या' फायबर युक्त पदार्थांचा समावेश, हृदयाला मिळेल पोषण

Follow Us
Follow Us:

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
रक्तवाहिन्या ब्लॉक कशामुळे होतात?
सर्वाधिक फायबर असलेले पदार्थ?

बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचते. बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. याशिवाय तरुण वयात हार्ट अटॅक किंवा उच्च रक्तदाबाचा धोका वाढल्यामुळे शरीराची योग्य काळजी घेण्याचा सल्ला कायम दिला जातो. कारण आहारात सतत तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हार्ट अटॅक आल्यानंतर वेळीच उपचार न केल्यास मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व

हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढल्यानंतर कायमच जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. प्रामुख्याने कोलेस्टेरॉल, व्यायाम, रक्तदाब आणि औषधोपचार करून शरीराची काळजी घेतली जाते. पण हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी कोणत्या फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे, चला तर जाणून घेऊया. हे पदार्थ शरीरात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकतात आणि रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करतात. याशिवाय हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉल कसे कमी करते?

तिखट, तेलकट किंवा आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी जमा होते. अशावेळी फायबर असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील एलडीएलचे वाढलेले प्रमाण धमन्यांमध्ये अडथळे निर्माण करते. ज्यामुळे कालांतराने हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. द्रावणीय फायबर पचनसंस्थेत पाणी शोषून घेऊन जेलसारखा पदार्थ करते. हा पदार्थ पित्ताम्लाशी बांधला गेल्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडून जातात. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया मंदावते, रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते. लवकर काही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही.

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध

भारतीय आहारातील सर्वाधिक फायबर असलेले पदार्थ:

दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे तूरडाळ, मूगडाळ, राजमा, चणे, मटकी आणि मोड आलेली कडधान्ये, ओट्स, बार्ली, गहू, नाचणी, ज्वारी आणि बाजरी, पेरू, सफरचंद, नाशपाती, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. याशिवाय अळशीच्या बिया आणि चिया सीड्स शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फायबरयुक्त पदार्थ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात का?

    Ans: होय. विशेषतः soluble fiber (विरघळणारे फायबर) आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे LDL म्हणजेच ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

  • Que: कोलेस्ट्रॉलसाठी कोणते फायबरयुक्त पदार्थ खावेत?

    Ans: ओट्स, जवस, कडधान्ये, हरभरा, राजमा, फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा आहारात समावेश करता येतो.

  • Que: फायबर खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल पूर्णपणे निघून जाते का?

    Ans: फायबरयुक्त आहार LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो; मात्र रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले प्लाक किंवा कोलेस्ट्रॉल ‘कायमचे नष्ट’ होते असे म्हणणे योग्य नाही. कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

Web Title: Eliminate harmful cholesterol clinging to your blood vessels for good include these fiber rich foods in your diet to nourish your heart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol control news
  • healthy heart

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.