
'या' पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल
मेंदूच्या आरोग्यासाठी घातक पदार्थ?
मेंदूच्या कार्य कायमच सक्रिय राहण्यासाठी काय खावे?
वारंवार चहा कॉफी पिण्याचे दुष्परिणाम?
मानवी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. शरीरातील हालचाली आणि विचार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी मेंदू अतिशय महत्वपूर्ण काम करतो. पण बऱ्याचदा दैनंदिन आहारात केलेल्या चुकांमुळे मेंदूच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर आणि स्मरणशक्तीवर दिसून येतो. त्यामुळे आहारात केवळ एका अन्नपदार्थावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. मेंदूला सतत ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्याचे कार्य सुरळीत चालू असणे फार आवश्यक आहे. अन्यथा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पण उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर मेंदूच्या रक्तवाहिन्यांना इजा पोहचते आणि आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – istock)
उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
आपल्यातील अनेकांना कायमच चहा किंवा कॉफी पिण्याची सतत सवय असते. वारंवार चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे थकवा कमी होतो, पण मेंदूच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. चहा कॉफीमध्ये जैव-सक्रिय घटक आणि कॅफीन आढळून येते. हे घटक योग्य प्रमाणात घेतल्यास लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. पण दिवसभरात सतत चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यास छातीत धडधडणे, चिंतातुरता, झोप न येणे इत्यादी समस्या वाढू लागतात.
मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी सॅल्मन, सारडिन आणि मॅकरेल यांसारख्या तेलकट माशांचे सेवन करावे. या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळून येते. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालक, मेथी आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये फोलेट, विटामिन के, कॅरोटिनॉईड्स इत्यादी घटक आढळून येतात. या भाज्यांच्या सेवनामुळे केवळ मेंदूचे आरोग्य नाहीतर ह्रद्य आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुद्धा सुटका मिळते.
आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीजचा समावेश करावा. यामध्ये फायबर, पॉलीफेनॉल्स, अँथॉसियानिन्स, अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध आहेत. मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड खूप फायदेशीर मानले जाते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भिजवलेले दोन किंवा तीन अक्रोड खाल्ल्यास मेंदूचे आरोग्य कायमच हेल्दी राहील. टोमॅटोमध्ये लायकोपीन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट, कॅरोटिनॉईड्स, विटामिन सी आढळून येते.
Ans: अतिरिक्त साखर, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त मीठ, ट्रान्स फॅट किंवा अस्वास्थ्यकर चरबी असलेले पदार्थ वारंवार आणि मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास एकूण आरोग्यावर तसेच मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
Ans: होय. मेंदूला योग्य पोषण मिळणे त्याच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहे. संतुलित आहारामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.
Ans: अतिरिक्त साखरेचे नियमित सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे साखरयुक्त पेये, मिठाई आणि अतिगोड प्रक्रिया केलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात घेणे योग्य.