
कुत्रे पुरुषांना अधिक प्रमाणात का चावतात (फोटो सौजन्य - iStock)
इतकंच नाही तर गेल्या काही वर्षांत रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि त्यासोबतच हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी बहुतेक वेळा पुरुष असतात? हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण तुम्हाला याची कारणे माहीत आहेत का? या लेखातून आम्ही तुमच्यापर्यंत याची कारणे पोहचवत आहोत.
भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर! तर ‘या’ देशात नाही एकही भटका कुत्रा
७०% पेक्षा जास्त बळी पुरुष
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी बहुतेक पुरुष असतात आणि महिलांना बळी पडण्याची शक्यता कमी असते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की पुरुषांना कुत्र्यांनी चावण्याचा धोका अंदाजे १.८ पट असतो. काही अभ्यासातून असे आढळून आले आहे की कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ७०% पुरुष असतात. यामागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया
काय आहेत कारणं
कुत्र्याने चावल्यास काय करावे?
कुत्रा चावल्यास, प्रथम जखमी झालेला भाग साबण आणि पाण्याने धुवा, नंतर जवळच्या आरोग्य केंद्रात जा आणि आवश्यक असणारे लसीकरण करा. WHO मार्गदर्शक तत्त्वांनुसार चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय मदत आणि लसीकरणाला प्राधान्य दिले जाते. कुत्रा चावल्यानंतर निष्काळजीपणा खूप गंभीर असू शकतो आणि रेबीजचा संसर्ग मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो हे लक्षात ठेवा. हे लक्षात घेतले पाहिजे की भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक रेबीजच्या संसर्गामुळे मरतात.