सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील भटके कुत्रे आणि मुंबईतील कबुतरखान्यावर निर्णय देताना मानवी आरोग्याला प्राधान्य दिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Delhi Street Dog and Mumbai Kabutar khana : नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांवर भूतदया दाखवण्यावरुन आता देशामध्ये वाद वाढला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा ताप वाढला आहे. तर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जागोजागी असलेल्या कबुतरखान्यावरुन वाद पेटला आहे. एकीकडे आरोग्याचे निर्माण होणारे प्रश्न तर दुसरीकडे प्राण्यांवर माया दाखवणाऱ्या लोकांच्या भावना असा हा संघर्ष सुरु आहे. दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये यावरुन वाद सुरु असून याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश महत्त्वाचे आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन्ही शहरातील या प्रकरणाच्या निकालामध्ये आरोग्याला प्राधान्य दिले आहे.
दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. भटके कुत्र्यांमध्ये नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहचत आहे. दिल्ली आणि एनसीआर भागात अनेक लोकांना भटके कुत्रे चावल्याने रेबीज आजाराचा सामना करावा लागला आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला याबाबत अत्यंत महत्वाचे आदेश दिले आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कोर्टाने या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर दुसरीकडे मुंबई हाय कोर्टामध्ये दादरमधील लोकप्रिय असलेला कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कबुतरांच्या विष्ठेतून माणसांना अनेक रोग होतात. कबुतरांमुळे दमा आणि कॅन्सर होण्याची मोठी शक्यता असते. यामुळे मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेला हा दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले. पालिकेने या कबुतरखान्यावर ताडपत्री देखील टाकली आहे. मात्र या निर्णयाला जैन समाजाकडून तीव्र विरोध केला जातो आहे. या परिसरामध्ये जैन समाजाने आक्रमक आंदोलन करुन ताडपत्री काढून देखील टाकली. तसेच कबुतरांना कोर्टाच्या निर्णयाविरोधात जात धान्य देखील टाकले.
कबुतरखान्याविरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय ठाम
हायकोर्टाने कबुतरांना अन्न, पाणी घालण्यास बंदी कायम ठेवली. मग कबुतरखान्यावरील बंदी उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने देखील कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे. सुप्रीम कोर्टाने कबुतरखान्यासदर्भात हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरील बंदी ही मुंबईमध्ये कायम राहणार आहे. यामुळे मुंबईमध्ये वातावरण तापले आहे. वेळ पडल्यास कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाण्याची वक्तव्य देखील केली जात आहेत. यावरुन मुंबईमध्ये वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सर्वोच्च न्यायालयाच्या या दोन्ही निर्णयावर प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. काही प्राणी हक्क कार्यकर्ते आणि संघटनांनी विरोध दर्शवत हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी या निर्णयाला अव्यवहार्य म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, दिल्लीत तीन लाखांहून अधिक कुत्रे आहेत आणि त्या सर्वांना आश्रयगृहात ठेवण्यासाठी १५,००० कोटी रुपये खर्च येतील, जे दिल्ली सरकारसाठी शक्य नाही. त्या म्हणतात की, हा निर्णय प्राण्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करतो, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच राहुल गांधींनी देखील दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.