कडक उन्हाळ्यात वाढू शकतो 'या' भयानक आजारांचा धोका!
उन्हाळा ऋतू सुरु झाल्यानंतर आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण कडक उन्हामुळे शरीराच्या तापमानात अनेक बदल होऊ लागतात. उष्णता वाढल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय मार्च महिन्यात उन्हाचा पार 30 अंशाच्या वर गेल्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढू लागतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरासह त्वचा आणि केसांची योग्य काळजी घ्यावी. उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराचे तापमान वाढते आणि सतत चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा उलट्या मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. ऊन वाढल्यामुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे आणि शरीराची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
रेडिओथेरेपीच्या नंतर देखील पुन्हा होऊ शकतो कॅन्सर; संशोधकांच्या या सल्ल्याला दुर्लक्षित करू नका
कडक उन्हामुळे अनेकांना उष्माघाताची समस्या उद्भवते. याशिवाय वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अधिककाळ उन्हामध्ये गेल्यानंतर सोबत पाण्याची बाटली, एनर्जी ड्रिंक आणि तोंडाला स्कर्फ बांधून बाहेर जावे. हे उपाय केल्यास शरीराचा उष्माघातापासून बचाव होईल. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात शरीरसंबंधित कोणते आजार उद्भवण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उन्हाळा वाढल्यानंतर शरीराच्या तापमानात अनेक बदल होतात. बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा इतर वेळी वाढत्या गर्मीमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत डोकं दुखणे, चक्कर येणे, थकवा, अशक्तपणा इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ओठ पूर्णपणे कोरडे होऊन लघवीचा रंग बदलतो. त्यामुळे या दिवसांमध्ये भरपूर पाण्याचे सेवन करावे. यासोबतच लिंबू पाणी, ताक, आवळ्याचा रस इत्यादी हेल्दी आणि प्रभावी पेयांचे सेवन करावे.
कडक उन्हाळ्यात आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय रात्री किंवा दुपारच्या जेवणात उरलेल्या शिळ्या पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते आणि गॅस, अपचन, ऍसिडिटी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात ताजे आणि पचनास हलके असलेले अन्नपदार्थ खावेत.
उन्हाळा वाढल्यानंतर कोणत्याही अतिउष्ण ठिकाणी फिरण्यास किंवा जंगल सफारी करण्यास जाऊ नये. यामुळे उष्माघाताची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी, ताजे अन्नपदार्थ आणि कॉटनचे कपडे परिधान करावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. आरोग्यासंबंधित कोणतीही गंभीर समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.