रेडिओथेरेपीच्या नंतर देखील पुन्हा होऊ शकतो कॅन्सर; संशोधकांच्या या सल्ल्याला दुर्लक्षित करू नका( फोटो सौजन्य- PINTEREST)
‘कॅन्सर’ नाव ऐकताच धडकी भरते. कॅन्सरचे रुग्ण आता वाढत चालले आहे. कॅन्सरचे मोठं मोठे हॉस्पिटल देखील उभारण्यात आले आहे. आणि त्या हॉस्पिटल मध्ये त्यांचा उपचार देखील सुरु आहे. कॅन्सरच्या रुग्णांसाठी रेडिओथेरपी एक प्रभावी उपचार समजले जाते. मात्र एका नवीन रिसर्च मध्ये आश्चर्य करणारा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की रेडिओथेरेपीच्या नंतर देखील शरीरात छोटे कॅन्सरचे सेल्स असू शकतात. जो स्कैनमध्ये दिसत नाही. हे सेल्स भविष्यात पुन्हा एकदा कॅन्सरला जन्म देऊ शकतात आणि रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मेडिकल सेंटरच्या शोधकर्त्यांनी याचा खुलासा केला आहे.
संशोधनानुसार, रेडिओथेरपीच्या नंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये अनेकदा दिसून येतो की ट्युमर पूर्ण संपला आहे. मात्र महिने किंवा वर्षांनं नंतर जेव्हा बायोप्सी केली जाते, तेव्हा उर्वरित कर्करोगाच्या पेशी त्यात आढळतात. जो स्कॅनमध्ये पकडण्यात येत नाही. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की फक्त स्कॅनवर विश्वास ठेवणे बरोबर नाही आहे. उपचारानंतर, रुग्णाच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे आणि अतिरिक्त चाचण्या करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण कर्करोग हा पुन्हा होण्याची शक्यता कमी होऊ शकेल.
संशोधनानुसार, रेडिओथेरेपीची एक विशेष टेक्निक स्टिरियोटैक्टिक एब्लेटिव रेडियोथेरेपीचा वापर अनेकदा फेफडे, लिवर, प्रोस्टेट आणि अन्य अंगाच्या कर्करोगाचा उपचार करताना करण्यात येत. हे टेकनिक अगदी अचूकपणे रेडिएशन वितरीत करते आणि स्कॅन मध्ये चांगले परिणाम दाखवते. मात्र स्कॅन वर पूर्णपणे विश्वास करणे धोकादायक असू शकते. कारण फेफड्यांच्या कॅन्सर मध्ये ४०%, किडनीच्या कॅन्सरमध्ये ५७-६९%, प्रोस्टेट कॅन्सर मध्ये ७.७-४७% आणि लिवर कॅन्सर मध्ये ०-८६.७% प्रकरणात टिशू पडताळणीमध्ये कॅन्सर सेल्स मिळाले,जेव्हाकी स्कॅन मध्ये काही दिसले नाही.
कॅन्सर पुन्हा होण्याचा मोठा धोका
संशोधक म्हणतात की जेव्हा शरीरात छोटे कॅन्सर सेल्स वाचतात, तर हे भविष्यात कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता वाढते. कर्करोग हा केवळ त्या अवयवापुरता मर्यादित नाही तर तो शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो. खासकर रेक्टल (मलाशय ), सर्वाइकल (गर्भाशय ग्रीवा), प्रोस्टेट आणि लिवर कॅन्सर मध्ये हा धोका जास्त दिसून आला आहे.
कस वाचू शकता ?
एक्सपर्टचे मत असे आहे की कॅन्सरच्या रुग्णांनी केवळ स्कैनवर भरोसा नाही केले पाहिजे तर नियमित रूपाने बायोप्सी आणि टिशू टेस्ट करण गरजेचे आहे. तसेच शरीरात कुठेही सूज, गाठ या असामान्य लक्षण दिसले, तर लगेच तपासले पाहिजे. याशिवाय, शस्त्रक्रियेनंतरही, लपलेल्या कर्करोगाच्या पेशी वेळेत शोधता याव्यात म्हणून दीर्घकालीन देखरेख आवश्यक आहे.
एपिलेप्सी म्हणजे नेमकं काय? मेंदूसंबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे