Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eye Care: दिवाळीमध्ये डोळ्यांची काळजी घ्या, सुरक्षित राहा; सुरक्षेसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला

दिवाळी म्हटलं की फटाके हे समीकरणच डोळ्यासमोर येते. पण फटाके फोडत असताना डोळ्यांची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वाना तज्ज्ञांनी या लेखातून सांगितले आहे. प्रत्येकाने हे वाचावे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 18, 2025 | 07:48 PM
दिवाळीत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

दिवाळीत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • डोळ्यांची काळजी कशी घ्यावी
  • दिवाळीदरम्यान डोळ्यांची काळजी कशी घ्यावी 
  • तज्ज्ञांचे मत 

दिवाळी हा प्रकाशाचा, दिव्यांचा आणि फटाक्याचा सण असतो. दिवाळीत सगळ्याच वयोगटातील व्यक्तींना फटाके फोडायला आवडत असले तरी फटाक्यांमुळे विशेषतः डोळ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. दर वर्षी अनेकांच्या डोळ्यांना इजा होते. फटाक्यांमुळे इजा होणाऱ्या अवयवांमध्ये हात आणि बोटांखालोखाल डोळ्यांचा नंबर लागतो.

फटाक्यांमुळे निर्माण होणारा धोका हा फक्त फटाके फोडणाऱ्यांपर्यंतच मर्यादित नसून यापैकी निम्मी प्रकरणे ही फक्त फटाके फुटण्याच्या ठिकाणी उभे असलेल्या व्यक्तींची असतात. म्हणून या संदर्भातील जागरुकता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.  डॉ. वंदना जैन, चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर, डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल यांनी महत्त्वाचे उपाय आणि काळजी कशी घ्यावी सांगितली आहे. 

फटाक्यांचा डोळ्यांवर कशा प्रकार परिणाम होतो

  • इजा होण्याचे प्रकार : डोळे चुरचरण्यापासून ते कॉर्नियाला खरचटण्यापर्यंत ते रेटिनामध्ये गंभीर प्रकारच्या गुंतागुंतीपर्यंत आणि डोळा फाटण्यापर्यंत अनेक प्रकारच्या इजा होऊ शकतात. काही वेळा अंधत्वसुद्धा येऊ शकते
  • रसायने आणि धूर : यामुळे डोळे चुरचुरतात, डोळ्यातून पाणी येते आणि घशाच्या व फुफ्फुसाच्या समस्या निर्माण होतात
  • फुलबाज्या : अत्यंत धोकादायक, 1,800 अंश फॅरेनहाइट तापमानाला जळत असतात, काच वितळविण्यासाठी हे तापमान पुरेसे असते आणि त्यामुळे तिसऱ्या श्रेणीतील भाजण्याचे प्रकार घडतात
  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरणारे : डोळे दीर्घ कालाधीपर्यंत उष्णतेच्या थेट संपर्कात आले तर कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळे चुरचुरू शकतात. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी फटाके हाताळताना अधिक सावधान असावे, जेणेकरून रसायनांमुळे होणाऱ्या तसेच उष्णतेमुळे भाजले जाण्याच्या धोक्यापासून डोळ्यांचे संरक्षण करता येईल.

डोळ्यांना होणारी प्रमुख इजा

  • ओपन ग्लोब इजा : डोळ्याच्या पडद्याला जाड चीर जाणे
  • क्लोज्ड ग्लोब इजा : डोळ्याचा पडदा न फाटता डोळ्याला मार बसणे
  • डोळ्याभोवती सूज किंवा व्रण : डोळ्याभोवती जखम होणे
  • डोळ्याच्या बाह्यपटलाला हलकीशी इजा होणे : अंशतः जखम होणे 
  • खोलवर इजा : डोळ्याच्या बाह्यपटलाच्या आतपर्यंत छेद जाणे
  • छिद्र करणारी दुखापत : डोळ्यात आतपर्यंत बाह्य कण वा वस्तू जाणे
  • पूर्ण छेद देणारी दुखापत : यात एखादी वस्तू डोळ्याच्या एका बाजूने आत शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडते.

डोळ्यांची कमी झालेली नजर होईल तीक्ष्ण! चष्म्याचा नंबर कायमचा घालवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ

कसे करावे उपाय?

डोळ्यांना वरवर जखम झाली असेल तर अशा रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात येतात. पण डोळ्याच्या पडद्याला चीर गेली असेल तर काळजीपूर्वक उपचार करावे लागतात. अनेक प्रकरणांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यात डोळ्याच्या पारपटलाला (कॉर्निअल टिअर) किंवा श्वेतपटलाला चीर जाणे, याचा समावेश होतो. आघातामुळे काही वेळा डोळ्यातील बाहुली तिच्या मूळ स्थानापासून वेगळी होणे (इरिडोडायलिसिस), डोळ्याच्या पुढील भागात रक्तस्राव होणे (हायफिमा), डोळ्याच्या आत बाहेरील वस्तू (आयओएफबी) असल्याचा संशय निर्माण होणे किंवा डोळ्याचे बाह्य पटल फाटणे (ग्लोब रप्चर) अशी गुंतागुंत उद्भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल होणे आवश्यक ठरते.

सुरक्षिततेसाठी पुढील काळजी घ्यावी

  • डोळ्यात कण गेल्यास पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे
  • रसायनांचा संपर्क आल्यास किमान 30 मिनिटे डोळे स्वच्छ पाण्याने धुवा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • बाहेरील कण बाहेर निघत नसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या
  • फटाके केवळ मोकळ्या जागेतच फोडा
  • डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक चष्मा वापरा
  • फटाके पेटवताना हाताच्या लांबीएवढे अंतर ठेवा आणि फटाके फोडताना पाहताना किमान 5 मीटर अंतर ठेवा
  • फटाके लावण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढा
  • वापरलेले फटाके फेकण्यापूर्वी पाण्यात भिजवा
  • अपघाताच्या वेळी वापरण्यासाठी पाणी किंवा वाळू जवळ ठेवा
  • फटाके लहान मुलांच्या संपर्काबाहेर, सुरक्षित ठिकाणी ठेवा
  • मजबूत चप्पल किंवा बूट घाला
  • मुलांकडून फटाके फोडताना नेहमी मोठ्यांनी देखरेख करावी.

अशी घ्या डोळ्यांची काळजी

काय करू नये

  • जखमी डोळे चोळू किंवा दाबू नका
  • डोळ्यात अडकलेले कण स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नका.
  • बाजारात मिळणारे डोळ्यांचे ड्रॉप्स किंवा वेदनाशामक औषधे स्वतःहून वापरू नका
  • फटाके फोडताना सिंथेटिक कपडे घालू नका
  • फटाके चेहऱ्याजवळ, केसांजवळ किंवा कपड्यांच्या जवळ धरू नका
  • सुरक्षितता बाळगून सण साजरा करा, फटाक्यांचा वापर मर्यादित ठेवा आणि आपल्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाचेही रक्षण करा. आपत्कालीन परिस्थितीत डोळ्यांच्या दुखापतीसाठी डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल येथे 24×7 तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे.

Web Title: Eye care during diwali play safe advice by chief strategy officer dr vandana jain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • Diwali
  • eyes health
  • Health Tips

संबंधित बातम्या

Diwali: धनेत्रोदशीनिमित्त खरेदी करा १ ग्रॅम सोन्याचे नाजूक साजूक झुमके, कानामधील दिसतील शोभून
1

Diwali: धनेत्रोदशीनिमित्त खरेदी करा १ ग्रॅम सोन्याचे नाजूक साजूक झुमके, कानामधील दिसतील शोभून

Diwali 2025: दिवाळीला घर सजवण्यासाठी किती दिवे लावणे शुभ आहे? मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायला विसरु नका दिवे
2

Diwali 2025: दिवाळीला घर सजवण्यासाठी किती दिवे लावणे शुभ आहे? मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायला विसरु नका दिवे

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे शुभ का मानले जाते? कुबेर आणि समृद्धीशी काय आहे संबंध
3

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला धणे खरेदी करणे शुभ का मानले जाते? कुबेर आणि समृद्धीशी काय आहे संबंध

Special Trains 2025: रेल्वेचा प्रवाशांसाठी मोठा धमाका! आजपासून ‘या’ मार्गावर धावणार पूजा स्पेशल ट्रेन्स
4

Special Trains 2025: रेल्वेचा प्रवाशांसाठी मोठा धमाका! आजपासून ‘या’ मार्गावर धावणार पूजा स्पेशल ट्रेन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.