डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक (फोटो- istockphoto )
आपण आपल्या शरीराची योग्य प्रकारे काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या शरीरातील सर्वच अवयव अत्यंत महत्वाचे असतात. मात्र त्यामध्ये आपले डोळे हा अतिशय महत्वाचा आणि नाजुक अवयव असतो. त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे महत्वाचे असते. सध्या अनेकांना डोळ्यांचे आजार होण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळते.
सध्या आपली बदललेली जीवनशैली, मोठ्या प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाईम तसेच आवश्यक पोषण शरीराला न मिळणे यामुळे डोळ्यांशी संबंधित आजार वाढू लागले आहेत. या गोष्टी किंवा अशा काही सवयी तुम्ही कायम ठेवल्या तर तुम्हाला डोळ्यांना काहीतरी आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो.
जर तुम्हाला तुमची दृष्टी कमकुवत करायची नसेल तर, तुम्ही तुमच्या 5 सवयी बदलून हा धोका टाळण्यास प्रयत्न करू शकता. यामुळे डोळ्यांचे आरोग्य वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या 5 सवयी बदलून तुम्ही डोळ्यांचे आरोग्य वाढवू शकता.
स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न
सध्याचे आपले का पाहता, जवळपास सवरच काम लॅपटॉप, मोबाइल यावर अवलंबून असते. त्यामुळे पूर्ण दिवसातील बराचसा वेळ स्क्रीनवर जातो. मात्र खूप वेळ स्क्रीनवर काम करणे डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. स्क्रीनमधून येणार प्रकाश यामुळे तुमच्या डोळ्यांना थकवा येऊ शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइम कसा कमी करता येईल यावर काम केल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
शरीराला हानिकारक अन्न टाळावे
आपण जे काही खातो त्याचा परिणाम थेट आपल्या डोळ्यांवर होत असतो असे म्हणतात. व्हिटॅमिन ए, सी, ई अशी जीवनसत्व आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत. त्यामुळे सकस आहाराचा समावेश आपल्या जीवनात करण्याचा प्रयत्न करावा.
नियमित डोळ्यांची तपासणी न करणे
नियमितपणे डोळ्यांची तपासणी केल्याने देखील आपल्याला वेळोवेळी डोळ्यांना काय त्रास असेल तो समजण्यास मदत होऊ शकते. अंधुक दिसणे, डोळ्यांची आगआग होणे अशा समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यामुळे डोळ्यांची नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.
अपुरी झोप घेणे
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगली झोप मिळणे देखील आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्याने डोळ्याना सूज येणे, डोळ्यांखाली काळे होणे अशा समस्या येऊ शकतात. तीमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक आहे.