या आयड्रॉप्सच्या मदतीने चष्म्याची गरज भासणार नाही? किंमत फक्त 350 रुपये, काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
आजच्या या धावपळीच्या आणि व्यस्त युगात अनेकजण डोळ्यांच्या समस्येने ग्रासलेले आहेत. आजकाल मोठ्यांनाच काय तर लहानांनाही फार कमी वयापासून चष्मा लागतो. ही चष्म्याची समस्या दूर करण्यासाठी अनेक लोक निरनिराळे प्रयत्न करू पाहतात मात्र त्यांना यात यश मिळत नाही. मात्र आता या समस्येला मात करणारे एक औषध मिळाल्याचा दावा एका औषधनिर्मिती कंपनीकडून करण्यात आला आहे. या औषधाचे नाव आहे प्रेस्वू आयड्रॉप (PresVu Eyedrop).
औषध नियामक कंपनीने या आठवड्यात प्रेस्वू’ला मंजुरी दिली आहे. हा देशातील पहिला असा आयड्रॉप आहे जो लोकांना चष्म्याशिवाय वाचन करण्यास किंवा स्पष्ट पाहण्यास मदत करेल. एन्टोड (Entod) फार्मास्युटिकल्सने हा आयड्रॉप लाँच केला आहे. माहितीनुसार, हे आयड्रॉप पुढील महिन्यापासून बाजारात उपलब्ध होईल. याची किंमत 350 असल्याचे सांगितले जाते आहे. कंपनीचा दावा आहे की, हा आयड्रॉप जवळच्या अंधूक दृष्टीसाठी एक सोपा पर्याय आहे आणि यावर कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मा आणि डोळ्यांची शस्त्रक्रिया हे इतर पर्याय आहेत. पण, हा लहानसा आयड्रॉप तुमचा चष्मा कायमचा घालवू शकतो का? चला याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – रतन टाटांना फार आवडायचं पारशी जेवण! जेवणात अनेक फायद्यांनी समृद्ध ‘या’ पदार्थाचा होतो सार्वधिक वापर
प्रो. एस. एस. पांडव, प्रमुख, ॲडव्हान्स्ड आय सेंटर, पीजीआयएमईआर चंदीगड, यांनी स्पष्ट केले की, पिलोकार्पिन हे एक जुने औषध आहे. हे औषध डोळ्यांच्या लक्ष करण्याच्या शक्तीवर प्रभाव टाकण्यासाठी ओळखले जाते. हे औषध काही निवडक लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. प्रिस्बायोपियाच्या सर्व केसेससाठी याची शिफारस केली जाऊ शकत नाही. या विशेष फॉर्म्युलेशनमध्ये कमी डोस (1.25%) वापरला जातो, ज्यामुळे दुष्परिणाम कमी होतात. मात्र, हे पूर्णपणे टाळता येत नाही. हे दुष्परिणाम कमी काळापुरतीच आणि सहन करण्यायोग्य आहेत. मात्र याच्या अधिक वापराने डोळ्यातील स्नायू, लेन्स आणि रेटिनासारख्या इतर संरचनांवर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे याचा वापर काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीतच करावा.
हेदेखील वाचा – नसांमधून घाणरडे साचलेले फॅट्स काढतील 5 काळे पदार्थ, Cholesterol च्या रूग्णांनी खावेच
डॉ. अशोक शर्मा, एमएस, नेत्रविज्ञान, पीजीआय, चंदीगड यांनी सांगितले की, या ड्रॉपच्या परिणाम काही काळासाठीच असतो. जसे की, जर कोणा रुग्णाने हे ड्रॉप्स सकाळी वापरले तर याचा परिणाम साधारण चार ते सहा तासांपर्यंत टिकतो. दुपारी आणखीन एक ड्रॉप्स टाकल्यानंतर याचा परिणाम संध्याकाळपर्यंत दिसू लागेल. त्यामुळे हा कायमस्वरूपी उपाय आहे असे नाही,” असे त्यांनी स्पस्ष्ट केले. ड्रॉप्सचा परिणाम काहीवेळासाठीच असल्याकारणाने तुम्हाला चष्मा हा कायम लावणे अनिवार्य ठरणार आहे.