कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय
आजच्या काळात चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहेत. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरात कोलेस्टेरॉल जास्त असल्यास रात्रीच्या वेळी जास्त थकवा येणे, अशक्तपणा, छातीत दुखणे, हात-पायांमध्ये मुंग्या येणे, स्नायू दुखणे आणि पेटके येणे आणि डोळ्यांजवळ पिवळी चरबी जमा होणे अशी लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या लेखात देत असलेल्या काळ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आराम मिळू शकतो असे डाएटिशियन मनप्रीत यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
ब्लॅक बीन्स
ब्लॅक बीन्सचा खाण्यात समावेश
ब्लॅक बीन्समध्ये असलेले फायबर, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स LDL कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि पचनशक्ती देखील मजबूत होते, त्यामुळे शरीर सहजपणे डिटॉक्स होते. आपल्या आहारामध्ये ब्लॅक बीन्सचा समावेश करून घेणे कोलेस्ट्रॉलसाठी उत्तम ठरते.
ब्लॅकबेरीज
ब्लॅकबेरीज करतील कोलेस्ट्रॉल कमी
तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक बेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात, जे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट असतात. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की काळ्या बेरीचे नियमित सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. तुम्ही आपल्या नाश्त्यामध्ये ब्लॅकबेरीजचा वापर करून घ्यावा
हेदेखील वाचा – LDL कोलेस्ट्रॉल नसांमधून बाहेर फेकेल ज्युस, औषधांची गरजही भासणार नाही
काळे तीळ
काळ्या तिळाचा करा खाण्यात समावेश
काळ्या तिळामध्ये असलेले सेसमोलिन रक्तदाब नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी करते. हे ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी ऍसिडचा एक चांगला स्रोत आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काळ्या तिळाची चटणी, पराठा वा बेकरी पदार्थांमध्ये काळ्या तिळाचा वापर करून तुम्ही खाऊ शकता
काळी द्राक्षे
काळ्या द्राक्षांचा करा उपयोग
याशिवाय, काळ्या द्राक्षांमध्ये रेसवेराट्रोल आढळते, जे रक्त गोठण्याची प्रक्रिया रोखते आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते. काळ्या द्राक्षांचा रस पिणे किंवा थेट खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. द्राक्षांच्या सीझनमध्ये तर हमखास काळी द्राक्ष खावीत. हल्ली १२ महिने तुम्हाला काळी द्राक्षं बाजारात उपलब्ध असतात.
हेदेखील वाचा – कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर फेकतील 5 पदार्थ, आजच खायला करा सुरूवात
ब्लॅक राईस
ब्लॅक राईस ठरेल उपयुक्त
काळ्या तांदळात अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्याचे नियमित सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही याचे सेवन करू शकता. ब्लॅक राईस हा आरोग्याला अधिक फायदेशीर ठरतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.