Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील पिंपल्स- टॅनिंग कायमचे होईल दूर! सुंदर त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, त्वचा दिसेल कायमच फ्रेश

चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी तुरटी फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे काळे डाग, पिगमेंटेशन, वांग इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळते. जाणून घ्या तुरटी वापरण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 16, 2025 | 02:41 PM
चेहऱ्यावरील पिंपल्स- टॅनिंग कायमचे होईल दूर! सुंदर त्वचेसाठी 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर

चेहऱ्यावरील पिंपल्स- टॅनिंग कायमचे होईल दूर! सुंदर त्वचेसाठी 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर

Follow Us
Follow Us:

सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग किंवा टॅनिंग वाढू लागते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट आणि स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण तरीसुद्धा चेहऱ्यावर ग्लो येत नाही. सुंदर दिसण्यासाठी केवळ महागडे प्रॉडक्ट नाहीतर पोषण आहार, शांत झोप आणि पचनक्रिया निरोगी असणे आवश्यक आहे. पचनाची समस्या निर्माण झाल्यानंतर चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स येतात. याशिवाय मोठ्या पिंपल्समुळे त्वचेला हानी पोहचते. त्यामुळे चेहऱ्याची योग्य काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

घरातील जीवाभावाच्या माणसांसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बनवा केमिकल फ्री पारंपरिक उटणं, त्वचेला होतील फायदे

बऱ्याचदा धूळ, माती, प्रदूषण इत्यादींच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे चेहऱ्यावर घाणीचा चिकट थर जमा होऊन त्वचा अतिशय तेलकट होऊन जाते. तेलकट त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होऊन जाते, ज्यामुळे मोठे मोठे पिंपल्स फोड येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुरटीचा वापर संपूर्ण आरोग्यासाठी केला जातो. यामुळे शरीराची कार्य सुधारतात.

पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी तुरटीचा उपाय:

तुरटीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, तवा गरम करून त्यावर तुरटीची पावडर भाजून घ्या. त्यानंतर हळूहळू तुरटीला पाणी सुटेल आणि वाफ येईल. त्यानंतर तुरटी पावडर काढून त्यात मुलतानी माती मिक्स करा. पेस्ट बनवण्यासाठी तयार केलेल्या मिश्रणात गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन, काळे डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.तुरटीचा फेसपॅक १० ते १५ मिनिटं हाताने चोळून घ्या. यामुळे त्वचेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. तयानंतर पाण्याने त्वचा धुवून घ्या.

जास्वंदीची लाल फुले केसांसाठी ठरतील वरदान! खोबऱ्याच्या तेलात मिक्स करताच केसांवर दिसेल कमाल, केस होतील सुंदर

तुरटीचा फेसमास्क चेहऱ्यावर लावून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर माॅईश्चराईजर लावणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेमधील कोरडेपणा कमी होतो आणि चेहरा हायड्रेट राहतो. तुरटीच्या वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा डागविरहित दिसते . याशिवाय संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी तुरटीचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करावी. अन्यथा त्वचेला हानी पोहचू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Face pimples tanning will go away forever use alum in this way for beautiful skin home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क
1

Skincare Routine: मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा होईल कमी! अंघोळी करण्याआधी शरीराला लावा ‘हा’ बॉडी मास्क

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण
2

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण

Skin Care: सैल त्वचा होईल टाईट! गोकर्णाच्या फुलांपासून घरीच तयार करा नाईट क्रीम, चेहऱ्यावरील काळे डाग- सुरकुत्या होतील गायब
3

Skin Care: सैल त्वचा होईल टाईट! गोकर्णाच्या फुलांपासून घरीच तयार करा नाईट क्रीम, चेहऱ्यावरील काळे डाग- सुरकुत्या होतील गायब

Hair Care Tips: केसांना मिळेल भरपूर पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश, केसांची मूळ होतील मजबूत
4

Hair Care Tips: केसांना मिळेल भरपूर पोषण! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश, केसांची मूळ होतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.