चेहऱ्यावरील डागांमुळे त्वचा अतिशय निस्तेज झाली आहे? मग 'हा' फेसपॅक करेल जादुई कमल
सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येकालच चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम लावल्या जातात. त्वचा चमकदार करण्यासाठी महिला भरमसाट पैसे खर्च करतात. पण पोषक घटकांच्या कमतरतेमुळे, अपुऱ्या झोपेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, कोरडी त्वचा, रॅश इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर वेगवेगळे उपाय केले जातात. चेहरा खराब होण्यामागे अनेक कारणे आहेत. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
वाढलेले प्रदूषण, धूळ, माती इत्यादी अनेक कारणामुळे त्वचा अतिशय खराब होऊन जाते. त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स किंवा मुरूम येतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्याही महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेचे सौंदर्य बिघडल्यानंतर चेहरा अतिशय कोरडा पडून जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील चमक वाढण्यासाठी घरगुती पदार्थांचा फेसपॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी मदत करेल.
त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी हळद, कच्चे दूध, कॉफी, मधचा वापर करावा. यासाठी तवा गरम करून त्यावर हळद भाजून घ्या. तव्यावरील हळद भाजून झाल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात कॉफी आणि मध मिक्स करा. नंतर त्यात कच्चे दूध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावरील टॅन कमी करण्यासाठी मदत करेल. फेसपॅक मान आणि त्वचेवर लावून काहीवेळ हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. या फेसपॅकच्या वापरामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन आणि टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात. हळदीचा फेसपॅक आठवड्यातून तीनदा नियमित लावल्यास चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी होईल.
सणावाराच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय सुंदर आणि ग्लोइंग करण्यासाठी कोणत्याही केमिकल फेसमास्कचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचा स्वच्छ करावी. हळद, कॉफी पावडर, मध आणि कच्चे दूध चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय पिंपल्समुळे त्वचेवर आलेले डाग किंवा पांढरे चट्टे कमी करण्यासाठी भाजलेल्या हळदीचा फेसपॅक तयार करावा.