फेस ट्रॉमा म्हणजे काय? (फोटो सौजन्य - iStock)
चेहऱ्यावरील आघात हे वेगवेगळ्या प्रकारे उद्भवू शकतात जसे की भाजणे, चट्टे पडणे, जखम, नाकाचे फ्रॅक्चर किंवा चेहऱ्याच्या हाडांचे इतर कोणत्याही प्रकारचे फ्रॅक्चर, तसेच यामुळे जखम किंवा डोळ्यांना दुखापत होऊ शकते. हे आघात अपघातानंतर लगेच किंवा काही कालावधीने दिसू शकतात.
काही सामान्य मॅक्सिलोफेशियल जखम म्हणजे पापणी, ऑर्बिटल, मॅक्सिलरी, मॅन्डिब्युलर किंवा चेहऱ्यावरील सामान्य विकृती. डॉ. देबराज शोम, कॉस्मेटिक सर्जन आणि संचालक – द एस्थेटिक क्लिनिक यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
फेस ट्रॉमामागील कारणे
यामागची कारणे म्हणजे अपघात किंवा काही खेळादरम्यान झालेल्या दुखापती असू शकतात. रग्बी आणि बॉक्सिंग धोकादायक असतात, कारण कार अपघात किंवा इतर कोणत्याही मार्गाने थेट तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. सर्वात सामान्य कारण म्हणजे रस्त्यावरील चारचाकी अपघात. कारण बऱ्याचदा लोकं त्यांचे सीटबेल्ट लावत नाहीत किंवा सुरक्षितपणे वाहन चालवण्याच्या नियमांचे पालन करत नाहीत, बऱ्याचदा कारचे नुकसान झाले नाही तरी त्याच्या आतील व्यक्तींना आघात होऊ शकतो.
वाढत्या गतीमुळे जेव्हा कार अचानक थांबते, तेव्हा ते कारच्या आतील वस्तूंवर, जसे की आरसा किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर आपले डोके आदळू शकते. वाहन चालवण्याकरिता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची शिफारस केली जाते. कारण ते तुम्हाला गंभीर आघातापासून वाचवू शकते.
फेस ट्रॉमाची काय आहेत लक्षणे
फेस ट्रॉमाची लक्षणे (फोटो सौजन्य – iStock0
चेहऱ्यावरील आघातामुळे अनेक लक्षणे आढळून येऊ शकतात ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.त्वचा कापली जाणे, जखम किंवा सूज यासारख्या शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त काही व्यक्तींना त्यांचा जबडा हलवण्यात किंवा तोंड पूर्णपणे उघडण्यात अडचण येऊ शकते.
या निर्बंधामुळे प्रभावित क्षेत्राभोवती वेदना आणि सवंदनशीलता भासू शकते, ज्यामुळे खाताना किंवा बोलताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये, चेहऱ्यावरील आघात हे डोळ्याच्या क्षेत्राजवळील नुकसानीमुळे दृष्टीत व्यत्यय आणू शकतात. शिवाय, ज्यांना चेहऱ्याचा आघात झाला आहे, त्यांच्यासाठी भावनिक त्रास हे एक अतिशय सामान्य परंतु अनेकदा दुर्लक्षित असे लक्षण आहे.
एखाद्याच्या देखाव्यावर झालेल्या दुखापतीच्या परिणामामुळे आत्म-चेतना आणि कमी आत्म-सन्मानाची भावना येऊ शकते. या मानसिक परिणामांचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या शारीरिक लक्षणांसाठी वैद्यकीय उपचारांव्यतिरिक्त समर्थन आणि समुपदेशन घेणे महत्त्वाचे आहे. चेहऱ्यावरील आघातांचे परिणाम संबोधित करून एखादी व्यक्ती सर्वांगीण उपचार आणि पुनर्प्राप्तीचे कार्य करू शकते.
चेहऱ्यावरील आघाताकडे दुर्लक्ष करु नका
चेहऱ्यावरील आघात (फोटो सौजन्य – iStock)
चेहऱ्यावरील आघात हा सहसा तुमच्या जीवनाला धोका नसतो, परंतु तो गुंतागुंतींशी संबंधित असतो. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तर दीर्घकाळाकरिता ते विकृत ठरु शकतात आणि यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये आणि तुमच्या चेहऱ्याच्या स्वरूपामध्ये नक्कीच समस्या निर्माण होतात.
निदान कसे कराल?
निदानाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रेडियोग्राफी, क्ष-किरणांचा वापर. सामान्यतः हाडांना दुखापत होते, म्हणून त्यांची प्रथम तपासणी केली जाते. चेहऱ्यावरील आघातांचे सर्व परिणाम शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सीटी स्कॅनद्वारे चेहऱ्यावरील आघात शोधणे. सीटी स्कॅन (कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन) तुमच्या चेहऱ्याच्या संपुर्ण हाडांची चाचणी करता येऊ शकते ज्यामध्ये प्रत्येक फ्रॅक्चर झालेले हाड स्पष्टपणे दिसते. मात्र हे प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध असेलच असे नाही.
हे सर्वात प्रभावी आहे आणि ज्या प्रकरणांमध्ये लोकांना अनेक जखमा झाल्या आहेत, त्यासाठी ते आवश्यक आहे, परंतु नेहमीच याचा वापर केला जात नाही. निदानाचा आणखी एक मार्ग म्हणजे अँजिओग्राफी, जी रक्तवाहिन्यांच्या आतील भागांची प्रतिमा दर्शविते. चेहऱ्यावर मोठ्या जखमा असतात तेव्हा निदानाकरिता हा मार्ग वापरला जातो, कारण बऱ्याचदा कुठेतरी रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
चेहऱ्यावरील आघातांवर उपचार कसे कराल
करण्यात येणारी शस्त्रक्रिया (फोटो सौजन्य – iStock)
या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये प्लॅस्टिक पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तंत्रांचा वापर केला जातो ज्यामध्ये प्राथमिक उपचार किंवा ड्रेसिंगच्या तंत्रापासून ते त्वचेचे कलम, टिश्यूचा विस्तार होतो. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांमध्ये चेहऱ्याचे न बरे झालेले फ्रॅक्चर किंवा चेहऱ्यावरील अस्थिभंगांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा चेहऱ्यावरील विषमतेवर उपचार करण्यासाठीच्या तंत्रांचा समावेश होतोजसे की, मॅक्सिलरी किंवा फ्रंटल हाडाचे फ्रॅक्चर.
मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रियेनंतर होणारी पुनर्प्राप्ती
पुनर्प्राप्ती ही आघात आणि शस्त्रक्रियेच्या प्रकारावर अवलंबून असते. जर शस्त्रक्रिया गुंतागुंतीची नसली तर, पुनर्प्राप्ती जलद होऊ शकते. मात्र काही गंभीर शस्त्रक्रियांमध्ये ज्यांना बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागतो, पुनर्प्राप्ती कालावधीमध्ये स्वतंत्र उपचार, विश्रांती आणि रुग्णाची भरपूर काळजी घेण्याचा समावेश असतो. सर्वात सामान्य पुनर्प्राप्ती वेळ सुमारे दोन आठवडे आहे. दोन आठवड्यांनंतर, रुग्ण सामान्यत: कामावर परत जाऊ शकतो.