इराणच्या नौसेनेने केला युद्धाभ्यास (फोटो- @PressTV/ट्विटर)
1. अनेक दिवसांपासून इस्त्रायल व इराणमध्ये संघर्ष सुरू
2. दोन्ही देशांचा एकमेकांवर मोठा हल्ला
3. इराणने डागली 11 मिसाईल्स
गेल्या अनेक दिवसांपासून इराण व इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. १३ जून रोजी इस्रायलने ऑपरेशन राझिंग लायन सुरु करत इराणवर हल्ला केला होता. इराणच्या वरिष्ठ लष्करी आणि अणु अधिकाऱ्यांना इस्रायलने ठार केले होते. इराणने 12 दिवसांचा संघर्ष संपल्यानंतर इराणच्या नौसेनेने आपले शक्तीप्रदर्शन केले आहे.
इस्त्रायलसोबतच 12 दिवसांचा संघर्ष संपल्यानंतर इराणने आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे. इराणच्या नौसेनेने लष्करी सराव सुरू केला आहे. इराणने या सरावाला ‘सस्टेनेबल पॅावर 1404’ असे नाव देण्यात आले आहे. इराणच्या नौसेनेने एका मिनिटांत तब्बल 11 मिसाईल्स डागले आहेत.
इराणच्या नौसेनेने ही मिसाईल्स ओमेन खाडी व हिंद महासागरात डागली आहेत. 12 दिवस सुरू असलेल्या युद्धात इस्त्रायलने इराणच्या एअर डिफेंन्स सिस्टिमचे मोठे नुकसान केले होते. तसेच अनेक अणूकेंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. दरम्यान इराणने लष्करी सराव करून इस्त्रायलसह शत्रू राष्ट्रांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.
इराणच्या नौसेनेचे शक्तीप्रदर्शन
एका अहवालानुसार, इराण नौसेनेच्या युद्धनौका आईआरआईएस सबलान आणि आईआरआईएस गनावेहने नासिर आणि कादीर मिसाईल्स डागली आहेत. या मिसाईल्सने आपले लक्ष्य सफलपूर्वक गाठले आहे. या मिसाईल्सच्या मदतीने समुद्रातील काही लक्ष्य नष्ट करण्यात आली आहेत. हा नौसेनेचा अभ्यास ओमान खाडी व हिंद महासागरात पार पडला.
Iran's Navy begins a major two-day naval missile exercise, codenamed Sustainable Power 1404, across the Gulf of Oman and the northern Indian Ocean.
Follow Press TV on Telegram: https://t.co/LWoNSpkc2J pic.twitter.com/Ez1OFTPC64
— Press TV 🔻 (@PressTV) August 21, 2025
इराण प्रत्युत्तर देण्यासाठी तयार
मागच्या महिन्यात इराणने ‘कसारेक्स’ नावाचा एक संयुक्त लष्करी अभ्यास केला होता. आता इराणने दक्षिण समुद्रात आपल्या ताकदीचे शक्तीप्रदर्शन केले आहे. हा सराव म्हणजे इस्त्रायलला एक प्रकारचा इशारा असल्याचे म्हटले जात आहे. शत्रूराष्ट्रांना इराणने स्पष्ट इशारा या सराव अभ्यासातून दिला आहे.
‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी
अमेरिका (America) आणि इराणमध्ये (Iran) पुन्हा संबंध बिघडण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी दिली आहे. खामेनींनी इराणवर पुन्हा हल्ला केल्यास याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलसोबत (Israel) पुन्हा एकदा तणाव बिघडण्याची शक्यता आहे. इराणने देखील शत्रू आता त्यांच्यावर हल्ला करु शकत नाही, असे म्हटले आहे. इराणने तेल मार्ग बंद केल्यास अमेरिकेला १५० डॉलर्स प्रति बॅरल तेलाचे भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. हे भरण्यास अमेरिका सक्षम नसल्याचे इराणने म्हटले आहे.