आतड्यांमध्ये चिकटलेला मल क्षणार्धात होईल स्वच्छ! सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'ही' आसन
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शरीरात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते,पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सतत सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. गॅस,अपचन किंवा ऍसिडिटी वाढल्यानंतर सतत उलट्या किंवा मळमळ वाटू लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र या गोळ्या तात्पुरता आराम मिळवून देतात.(फोटो सौजन्य – istock)
पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. पोटात गडबड, गॅस, पोटदुखी, सुस्तपणा, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही आसन केल्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मलासन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे आसन पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. सकाळी उठल्यानंतर मलासन केल्यामुळे आतड्यांवर तणाव येतो, ज्यामुळे मलप्रवृत्ती सहज होते. तसेच मलासन शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना ताकद मिळवून देतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
ताडासन करताना शरीर सरळ, ताठ राहते आणि पोटावर दाब येतो. ताडासन करताना हात वर करून ताठ उभे राहावे. यामुळे संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होते, ज्याचा परिणाम पचनसंस्थेवर लगेच दिसून येतो. सकाळी उठल्यानंतर नियमित १० मिनिट हे आसन केल्यास पोटात साचून राहिलेला वायू आणि मल बाहेर पडून जाण्यास मदत होते.
Uric Acid कसे कराल कमी? 5 पदार्थ आताच करा सुरू, शरीरातून फेकतील सडलेली घाण
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास पोटात साचून राहिलेले विषारी घटक आणि वायू बाहेर पडून जातात. तसेच उपाशी पोटी पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. भरपूर पाणी प्यायल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जाण्यासाठी पाण्याचे सेवन करावे.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे आतड्याची हालचाल कमी होणे किंवा मल (शौच) कठीण होऊन बाहेर पडायला त्रास होणे.
बद्धकोष्ठतेची कारणे?
कमी फायबर (तंतुमय पदार्थ) असलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाणे, पुरेसे पाणी न पिल्याने मल कठीण होऊ शकतो, नियमित शारीरिक हालचाली नसल्यास आतड्यांची हालचाल कमी होते.
बद्धकोष्ठतेची लक्षणे?
आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास होणे, मल (शौच) कठीण आणि कोरडा होणे, शौचास जोर लावावा लागणे, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोटदुखी.