Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fatty Liver: शरीर देतंय ‘हे’ संकेत? फॅटी लिव्हरची सुरुवात तर नाही ना; अजिबात दुर्लक्षित करू नका

Fatty Liver Early Signs: फॅटी लिव्हरचा त्रास असल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 07:22 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • फॅटी लिव्हरची लक्षणे
  • कोणाला अधिक धोका?
  • फॅटी लिव्हरपासून बचाव कसा कराल?
बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे फॅटी लिव्हरची समस्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे याला अनेकदा ‘सायलेंट’ आजार असेही म्हटले जाते. मात्र काही असे संकेत शरीर वेळोवेळी देत असते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घ्या.

Food Cravings: सतत काहीतरी खावंस वाटतंय? हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा? जाणून घ्या

सतत थकवा आणि अशक्तपणा

फॅटी लिव्हरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सततचा थकवा. पुरेशी झोप घेतल्यानंतरही, शरीरात ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू शकते आणि अगदी साधी दैनंदिन कामे करतानाही अशक्तपणा जाणवू शकतो. लिव्हरचे कार्य प्रभावित झाल्यास शरीराच्या ऊर्जा निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते, तेव्हा त्याच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे सतत थकवा जाणवू शकतो.

पोटाच्या उजव्या वरच्या भागात जडपणा किंवा वेदना

लिव्हर पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला असते. फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये सौम्य वेदना, दाब किंवा जडपणा जाणवतो.बऱ्याच लोकांना पोट भरल्यासारखे किंवा अस्वस्थता जाणवते. जरी ही वेदना तीव्र नसली तरी, ती सतत होत राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोट फुगणे आणि अपचन

जेवणानंतर वारंवार पोट फुगणे, अपचन होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसू शकतात. जास्त न खाताही पोट फुगणे, गॅस किंवा वारंवार अपचन होत असेल, तर हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते. जेव्हा लिव्हरच्या कार्यावर परिणाम होतो, तेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही, ज्यामुळे पोटात जडपणा जाणवणे, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.

भूक न लागणे आणि मळमळणे

फॅटी लिव्हर असलेल्या अनेक लोकांना भूक लागत नाही. त्यांना खाण्याची इच्छा होत नाही किंवा थोडेसे खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. काही लोकांना मळमळ किंवा उलटीचा त्रास देखील होतो.

कोणाला अधिक धोका?

लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्सचे वाढलेले प्रमाण, उच्च रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरचा धोका अधिक असतो. तसेच अयोग्य आहार आणि निष्क्रिय जीवनशैलीही जोखीम वाढवतात.

फॅटी लिव्हरपासून बचाव कसा कराल?

संतुलित आणि कमी तेलकट आहार घ्या.

नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात ठेवा.

साखर आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन मर्यादित ठेवा.

मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या करून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Gums Health: ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतंय? जाणून घ्या त्यामागची गंभीर कारणे

Web Title: Fatty liver symptoms early warning signs causes prevention tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • healthy liver
  • liver care

संबंधित बातम्या

फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश
1

फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हृदयावर ताण येतो? मग लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा थकवा- अशक्तपणा जाणवतोय? असू शकतो लिव्हर आणि हृदयसंबंधित ‘या’ आजारांचा धोका
2

झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा थकवा- अशक्तपणा जाणवतोय? असू शकतो लिव्हर आणि हृदयसंबंधित ‘या’ आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.