
चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
पचनक्रिया सुधारण्यासाठी उपाय?
आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे?
पचनक्रिया बिघडण्याची कारणे?
निरोगी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव स्वच्छ असणे फार आवश्यक आहे. शरीर डिटॉक्स झाल्यास प्रत्येक अवयवाचे कार्य सुरळीत चालू राहते. शौच, लघवी, घाम, किडनी, लिव्हर शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून गेल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दैनंदिन आहारात चिकन, मटण, फिश फ्राय, पचनास जाड असलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. उच्च प्रमाणात असलेले सॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रोटीन्स पचवण्यासाठी जास्त प्रमाणात ॲसिड आणि पित्त तयार करावे लागते, ज्याच्या परिणामामुळे आंबट ढेकर, अपचन, पित्त, उलट्या, जुलाब तर काहीवेळा डोकेदुखीचा खूप जास्त त्रास होतो. शरीरात वाढलेले पित्त प्रत्येक अवयवावर परिणाम करते. त्यामुळे आतड्यांमधील अन्नपदार्थ बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये चिकटलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर पचनक्रियेवर जास्तीचा तणाव निर्माण होतो. ज्याच्या परिणामामुळे अन्न पचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे अन्न सहज पचन करण्यासाठी बडीशेप किंवा ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्यात असलेले थायमॉल आणि जिऱ्यामधील पाचक एन्झाईम्स वेगाने स्त्राव वाढवण्यास मदत करतात. ज्याच्या परिणामामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होते. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी गरम करून त्यात बडीशेप, जिरं, ओवा गरम करून घ्या. तयार केलेले पाणी उकळल्यानंतर कोमट करून सेवन केल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल.
सगळ्यांचं जेवणाच्या ताटात झणझणीत आणि तिखट पदार्थ लागतात. पण नॉनव्हेज किंवा तेलकट पदार्थ खाण्याआधी काकडी, गाजर आणि टोमॅटोचे सॅलड बनवून खाल्यास पदार्थांमधील घटक मांसातील फॅट्सचे पचन सुलभ करण्यास मदत करते. या पदार्थांमध्ये खूप जास्त पाणी असते. ज्याच्या परिणामामुळे शरीर हायड्रेट राहते आणि पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.
सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा
दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही खावे. दही खाल्ल्यामुळे पोटात वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी होते. तसेच दह्यात असलेले हेल्दी बॅक्टेरिया अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात. पोट आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित दुपारच्या जेवणात वाटीभर दही खावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका हवी असल्यास दह्याचे सेवन करावे.
Ans: चिकन-मटणासोबत जास्त तेलकट, मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यास पचनास वेळ लागू शकतो. त्यामुळे पोट फुगणे, जडपणा किंवा अपचन जाणवू शकते.
Ans: सामान्यतः आतड्यांमध्ये घाण किंवा विषारी पदार्थ चिकटून राहतात आणि डिटॉक्स करून ते काढावे लागतात, असे मानणे योग्य नाही. शरीराची पचनसंस्था आणि आतड्यांची नैसर्गिक हालचाल मल बाहेर टाकण्याचे काम करते.
Ans: आहारात पुरेसे फायबर, भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. पुरेसे पाणी प्यावे आणि नियमित शारीरिक हालचाल करावी.