(फोटो सौजन्य: istock)
डायबिटीज आणि लठ्ठठपणाच्या औषधांचा केसांवर दुष्परिणाम
या अभ्यासानुसार, डायबिटीज आणि लठ्ठठपणाला कमी करण्यासाठी ज्या औषधांचा वापर केला जातो त्यांचा आपल्या केसांवर विपरित परिणाम होत असतो. शोधातून हे समोर आले की, अझेम्पिकसारखी GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट औषधे, विशेषतः सेमाग्लुटाइड आणि टिर्झेपेटाइड आपल्या केसांच्या वाढीवर वाईट परिणाम करत असतात. यामुळे केसगळती इतकी वाढते की टक्कल पडण्याची शक्यता असते. संशोधकांना यात असे आढळले की, SGLT-2 इनहिबिटर घेणाऱ्यांच्या तुलनेत GLP-1RA घेणाऱ्या लोकांमध्ये टक्कल पडण्याची शक्यता ३७% जास्त आहे. दुसरीकडे DPP-4 घेणाऱ्यांच्या तुलनेत हा धोका ६८% पेक्षा जास्त आहे.
सेमाग्लूटाइडची टाइप-2 डायबिटीज आणि लठ्ठपणा कमी करण्याची भूमिका
यातीलच एक औषध म्हणजे सेमाग्लूटाइड ज्याचा वापर मुख्य रुपात टाईप-२ डायबिटीजला नियंत्रित करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी केला जातो. याच्या कार्यपद्धतीविषयी बोलणे केले तर याचा संबंध GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट नावाच्या औषधांच्या गटातील आहे, जे भूक कमी करण्यासाठी आणि इन्सुलिनची पातळी वाढवण्यासाठी शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सची नक्कल करण्याचे काम करते.
Monsoon Travel Insurance : फिरण्याआधी काढा ट्रॅव्हल इंश्याॅरंस, कोणकोणते फायदे होतात ते जाणून घ्या
डीपीपी-४ एंझाइमवर परिणाम करणारी औषधे
मधुमेहाच्या उपचारासाठी डीपीपी-४ इनहिबिटर या औषधाचा वापर केला जातो. ही औषधे शरीरातील डीपीपी-४ एंझाइमला रोखण्याचे काम करते ज्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होण्यास मदत होते. या संशोधनात जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२४ याकाळातील विविध मधुमेह रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. संशोधनात जीएलपी-१ रिसेप्टर एगोनिस्ट आणि एसजीएलटी-२ इनहिबिटर वापरणाऱ्या लोकांची तुलना करण्यात आली. या अभ्यासातून या औषधांचा केसांच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का, याचा शोध घेण्यात आला.






