
सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा 'या' पेयाचे सेवन
दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साही करण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे शरीरातील थकवा अशक्तपणा कमी होतो. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी गाळून सेवन करावे. हा उपाय महिनाभर नियमित केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
मेथी दाण्यांचे पाणी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे सेवन केले जाते. याशिवाय पोटाच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते.
आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी धण्यांचे पाणी गुणकारी ठरते. यासाठी एक ग्लास पाण्यात रात्रभर अर्धा चमचे धणे भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून पाण्याला उकळी काढून पाण्याचे सेवन करावे. यामुळे लघवीच्या सर्वच समस्यांपासून सुटका होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी धण्यांचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते.
थकवा म्हणजे काय?
थकवा म्हणजे शारीरिक किंवा मानसिक उर्जेची कमतरता, ज्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते.
थकवा आणि आळस यात काय फरक आहे?
थकवा हा शारीरिक किंवा मानसिक उर्जेची कमतरता आहे, तर आळस हा काम करण्याची इच्छा नसणे किंवा टाळणे आहे.
थकवा येण्याची काही मानसिक कारणे आहेत का?
नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांमुळे थकवा येऊ शकतो.