छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील 'या' चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी चुकीच्या सवयी कायमच फॉलो केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. हात पाय दुखणे, डोकं दुखणे किंवा कंबर दुखणे इत्यादी अतिशय सामान्य समस्या आहे. या समस्या उद्भवू लागल्यानंतर सतत दुर्लक्ष केले जाते. पण छातीमध्ये दुखणे किंवा छातीमध्ये चमक येणे ही सामान्य लक्षणे नसून हार्ट अटॅक किंवा हार्ट ब्लॉकेजची गंभीर लक्षणे असू शकतात. त्यामुळे छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जीवनशैलीतील कोणत्या चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे छातीमध्ये वेदना किंवा जळजळ होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
बऱ्याचदा छातीमध्ये होणारी जळजळ पचनाच्या आजारांशी संबंधित असते. आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे छातीमध्ये वेदना वाढू लागतात. छातीमध्ये वेदना वाढल्यानंतर जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा अन्ननलिकेमध्ये अतिरिक्त पित्त जमा होण्यास सुरुवात होते. पोटात निर्माण झालेला गॅस वरच्या दिशेने सरकल्यानंतर हृदयावर जास्तीचा दबाव येतो. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे किंवा अचानक भीती वाटू लागते. अशावेळी जिरं किंवा ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे आम्ल्पित आणि गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लेक्स डिसीजमुळे छातीत वाढलेल्या वेदना थांबतात. पोटात तयार झालेल्या आम्ल्पितामुळे छातीच्या मध्यभागी जळजळ होणे किंवा छातीमध्ये टोचल्यासारखे दुखू लागते.
दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे पदार्थ आरोग्यावर लगेच परिणाम करतात. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. मसालेदार अन्न, तंबाखू, मद्यपान, जास्त प्रमाणात कॅफीन किंवा जेवणानंतर लगेच कोणत्याही गोड पदार्थाचे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीरसंबंधित समस्या वाढून आरोग्याला हानी पोहचते. ताणतणाव, मानसिक त्रास, झोपेचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे ऍसिडिटी वाढते.
छातीमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अजिबात तिखट, अतिमसालेदार किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय दुपारी किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर २ ते ३ तासाने झोपावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. तसेच कायमच हेल्दी राहण्यासाठी नियमित व्यायाम किंवा प्राणायाम करणे आवश्यक आहे. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. पण वारंवार छातीमध्ये वेदना किंवा डाव्या हातामध्ये वेदना होत असतील तर अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
छातीत दुखणे म्हणजे काय?
छातीत दुखणे म्हणजे छातीच्या पिंजऱ्यात (rib cage) किंवा छातीच्या समोरच्या भागात होणारी कोणतीही वेदना किंवा अस्वस्थता. हे दुखणे काही सेकंद ते काही तास किंवा दिवसांपर्यंत टिकू शकते.
छातीत दुखण्याची सामान्य कारणे काय आहेत?
हृदयविकाराचा झटका, एनजाइनाकिंवा हृदया जवळच्या भागांना रक्तपुरवठा कमी झाल्यास छातीत दुखू शकते. ऍसिडिटीमुळे छातीत जळजळ आणि वेदना होऊ शकतात.
छातीत दुखत असल्यास काय करावे?
घाबरल्यास, छातीत दुखणे आणखी वाढू शकते. शांत राहण्याचा प्रयत्न करा. जर वेदना तीव्र असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत असतील, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.