Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला

पहिली डेट ही नात्याच्या सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र या भेटीत केलेल्या काही चुका तुमचं इम्प्रेशन खराब करू शकतात. रिलेशनशिप कोचने पहिल्या डेटवर कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2026 | 08:15 PM
पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला

पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला

Follow Us
Follow Us:
  • पहिल्याच डेटवर सगळे सीक्रेट्स शेअर करू नका.
  • एक्स किंवा जुन्या रिलेशनशिपची चर्चा टाळा.
  • जास्त फ्लर्टिंग किंवा फिजिकल होण्याची घाई करू नका.
पहिली डेट ही प्रत्येकासाठी फास खास असते. ती पहिली भेट ज्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरला जवळून प्रत्यक्षात जाणून घेता येतं. आजकाल ऑनलाईन डेटींगचे प्रमाण फार वाढले आहे. नात्याची सुरुवातच ऑनलाईन चॅटींगने होते आणि नंतर कपल्स एकमेंकाना प्रत्यक्षात भेटण्याचा म्हणजेच डेटवर जाण्याचा निर्णय घेतात, अनेकदा पहिल्या डेटींगवरुनच नात्याची खरी सुरुवात केली जाते. एकमेकांना ओळखलं जात, अशात यात केलेल्या काही चुका तुमच्या नात्याला तडा आणू शकतात. पहिल्या डेटवर जाण्यासाठी तुम्हीही एक्सायटेड असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. फेमस रिलेशनशिप कोच आणि ऑथर जवाल भट्ट याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात पहिल्या डेटवर जाताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याचा सल्ला देण्यात आला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

प्रत्येक गोष्ट शेअर करु नका

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि लहानसहान गोष्टी लगेच पहिल्याच डेटवर शेअर करु नका. तुम्ही त्या व्यक्तीसोबत पुढे किती वेळ असाल याची शाश्वती नाही अशात आपले प्रत्येक सीक्रेट्स किंवा प्रत्येक अनुभव हा शेअर करायलाच हवा असं नाही. लहानसहान गोष्टींविषयी आणि एकमेकांच्या आवडीनिवडीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

गप्प राहू नका

डेटचा अर्थच आहे एकत्र भेटून संभाषण करणे ज्यातून एकमेकांना जाणून घेण्यास मदत होईल. अशात जर तुम्ही गप्प राहिलात किंवा संभाषण सुरु करण्याचा प्रयत्न केला नाही तर तुमची डेट बोरिंग ठरु शकते. संभाषणात भाग घ्या, समोरच्याच ऐका आणि लहान-सहान गोष्टींवरुन बोलायला सुरुवात करा. मोकळेपणाने मनातील विचार उघड करा आणि आपल्या भावना व्यक्त करा.

जुन्या डेट्स किंवा एक्सविषयी बोलणं टाळा

अनेकदा डेटवर लोक आपल्या एक्ससोबतचा अनुभव शेअर करतात किंवा जुन्या डेट्सना सध्याच्या डेटसोबत कम्पॅरिझन करु पाहतात. यामुळे वातावरण अनकंफर्टेबल बनते आणि तुम्ही जुन्या रिलेशनशिपमधून अजूनही बाहेर पडला नाहीत असं सिद्ध होतं. जुने अनुभव विसरुन जा आणि नव्याने सुरुवात करा. आपल्या एक्सविषयी किंवा वाईट अनुभवांविषयी फार बोलू नका. आधी नातं घट्ट तयार करा आणि विश्वास मिळवा आणि मग या गोष्टींची चर्चा करा.

बिलावरुन वाद घालू नका

बिल कोण देणार यावरुन उगाचच वाद घालत बसू नका. जर दोघांमधील एक बिल देण्यास तयार असेल तर शांतपणे चर्चा करा. बिलामुळे डेटचे चांगले वातावरण खराब होणार नाही याची काळजी घ्या.

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर

जास्त फ्लर्टींग करु नका किंवा फिजिकल होऊ नका

पहिल्याच डेटवर जास्त जवळ जाण्याचा किंवा आपल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करु नका. संमतीशिवाय शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना अस्वस्थ वाटू शकते. आधी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

Web Title: First date mistakes things to avoid relationship coach dating tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Dating terms
  • lifestyle news
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम
1

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
2

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
3

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
4

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.