(फोटो सौजन्य: Pinterest)
भारताचे पहिले गाव
माणा गाव उत्तराखंडातील पाैराणिक आणि ऐतिहासिक गाव मानले जाते. इथली सुंदरता आणि शांतता अनेक पर्यटकांना याकडे आकर्षित करते. याला पहिले भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जात होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला देशातील पहिल्या गावाची उपमा दिली. त्यांनी उपक्रम सुरु केला ज्यात सांगितले की, बऱ्याचदा आपण सीमावर्ती भागांना शेवटचे मानून त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो. पण आता, त्यांना प्रथम स्थान देऊन एका नव्या पर्वाची सुरुवात केली जात आहे. भारत-तिबेटच्या सीमावर्ती भागात हे गाव वसलेले असल्याने त्याला भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जात होते.
गावाच्या नावामागची कथा…
गावाला पाैराणिक महत्त्व लाभले असून याचे नाव मणिभद्रच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. काही दंतकथा असंही सांगतात की, भगवान शंकराकडून या गावाला खास वरदान दिले गेले आहे. यानुसार, जो कोणी या गावात आपले पाऊल ठेवतो तो श्रीमंत होतो. अशात अनेकलोक आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि श्रीमंत होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या गावाला भेट देतात.
राैद्र रुपात दिसते सरस्वती देवी
अनेक पुस्तकांमध्ये सरस्वती देवी विलुप्त होत असल्याचे सांगण्यात आले आहे. पण १८,००० फूट उंचीवर वसलेल्या माणा गावात आजही सरस्वती देवी राैद्र रुपात दिसून येते. खरंतर हे ठिकाण सरस्वती नदी आणि अलकनंदा नदीचे उगमस्थान आहे.
Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
चहाचे दुकान
अंस म्हणतात की, डोंगराळ ठिकाणी गेलात की तिथला चहा आणि मॅगी यांची चव नक्कीच चाखायला हवी. थंड हवामान, शांतता आणि निसर्गाने भरलेल्या अशा ठिकाणी गरमागरम चहा आणि मॅगीची चव काहीशी वेगळीच लागते. माणा गावातही तुम्ही कडक आणि मसालेदार चहाचा आनंद घेऊ शकता. पूर्वी इथल्या चहाच्या स्टाॅललाही शेवटचे स्थान होते जे आता पहिल्या स्थानावर आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, इथल्या चहाच्या दुकानाला जवळपास २५ वर्षे लोटली आहेत.