विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. केस कोरडे पडणे, केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस तुटणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर केसांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. केस मुलायम आणि मजबूत राहावे म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर कंडिशनरचा किंवा हेअर मास्कचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्ट केसांसाठी वापरणे अजिबात चांगले नाही. महागड्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे काही दिवस केस अतिशय चमकदार दिसतात. पण कालांतराने केस कोरडे होऊन जातात. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस कायमच घनदाट राहावे, म्हणून घरगुती पदार्थांचा वापर केसांसाठी करावा. आज आम्ही तुम्हाला जास्वदींच्या फुलांचा वापर करून कंडिशनर बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा
कंडिशनर लावून केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांमधील कोरडेपणा कमी होईल आणि केस चमकदार दिसतील. जास्वदींच्या फुलांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. याशिवाय आठवड्यातून एकदा तुम्ही जास्वदींच्या पानांचा लेप सुद्धा केसांवर लावू शकता. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होईल आणि केस सुंदर दिसतील. जास्वदींची पाने आणि मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर भिजवलेली पाने मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि नंतर केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे केस चमकदार आणि स्वच्छ होतील.