रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सवयी
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला ताण, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबासारखी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तात वाढलेली साखर शरीरासाठी धोकादायक ठरते. याशिवाय रक्तात वाढलेल्या साखरेकडे दुर्लक्ष केल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा होऊ शकते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो आणि आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोळ्या औषधंच नाहीतर आहारात बदल, नियमित व्यायाम करणे, तणाव कमी करणे इत्यादी गोष्टी फॉलो केल्यास शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयींमुळे शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतील.
अन्नपदार्थांचे सेवन केल्यानंतर ते ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते. ज्यामुळे शरीरात वाढलेले ग्लुकोज रक्तात साखरेची पातळी वाढवते. त्यामुळे जेवणानंतर लगेच साखर तपासणी केल्यास मधुमेह वाढला आणि की नाही हे तात्काळ दिसून येते. याशिवाय जेवणाच्या ३० मध्ये आधी किंवा जेवणाच्या २ तासानंतर रक्तातील साखरेची पातळी तपासावी. यामुळे शरीरात मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे की नाही हे लगेच समजून येते. मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढून शरीरातील इतर अवयवांना कोणतीही हानी पोहचत नाही. दैनंदिन आहार आणि वेळेवर इन्सुलिन घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याचदा व्यायामाकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय ध्यान, प्राणायाम किंवा शारीरिक हालचालींवर भर दिसल्यास शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होणार नाही. नियमित व्यायाम केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण जास्त व्यायाम केल्यामुळे हायपोग्लाइसेमिया सारखी समस्या उद्भवू शकते.