स्मूदीचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:
मराठी सिनेअभिनेत्री अमृत खानविलकर तिच्या अभिनयामुळे, डान्स आणि फिटनेसमुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. अमृता सोशल मीडियावर सतत काहींना काही शेअर करत असते. कधी तिचे स्किन केअर, हेल्थ केअर तर कधी हेअर केअर रुटीन सगळ्यांसोबत शेअर करत असते. मराठी इंडस्ट्रीतली फिटनेस आयकॉन अशी अमृता खानविलकरची ओळख आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी नाश्ता केला जातो. नाश्त्यामध्ये हेल्दी आणि शरीराला सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. नाश्त्यामध्ये नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री अमृता खानविलकर सकाळच्या नाश्त्यात नेमकं कोणत्या पदार्थाचे सेवन करते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
आंब्याची कुयरी फेकून न देता चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा बॉडी बटर, उन्हाळ्यात अंग होणार नाही चिकट
अमृता सकाळच्या नाश्त्यात ‘योगर्ट चिया स्मूदी’ चे सेवन करते. नाश्त्यामध्ये स्मूदी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. स्मूदी बनवताना अतिशय हेल्दी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. सोशल मीडियावर नुकताच अमृताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला तिने ‘अमृता खानविलकर काय खाते?’ असे हटके कॅप्शन दिले जाते. अमृता तिच्या आहारात, नाश्त्यात नेहमीच काहींना काही पौष्टिक पदार्थ खात असते.
चिया योगर्ट स्मूदी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. ही स्मूदी बनवताना दही, चिया सीडस्, खजूर, ओटस् मिल्क आणि सूर्यफुलाच्या बिया इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांमध्ये असलेले गुणधर्म वाढलेले वजन नियंत्रणात ठेवतात, शरीराला ऊर्जा देतात याशिवाय आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि प्रथिने इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात या स्मूदीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.
ड्रायफ्रूट आणि हेल्दी पदार्थांनी बनवलेली स्मूदी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. शरीरात होणारी जळजळ कमी करण्यासाठी चिया सिड्सचे सेवन करावे. आरोग्यासाठी दही खाणे अतिशय फायद्याचे आहे. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स शरीराचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात