Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कपाळावर चंदन किंवा कोरफड जेलचा लेप लावावा. यामुळे उष्णता कमी होण्यासोबतच त्वचा सुद्धा खूप फ्रेश राहते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2026 | 12:45 PM
शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश

शरीरात वाढलेली उष्णता आणि डोकेदुखीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, राहाल कायमच फ्रेश

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या गर्मीमुळे शरीरसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. शरीरात उष्णता वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. पोटात जळजळ, डोके दुखी, कपाळ जड झाल्यासारखे वाटणे, डोळ्यांची जळजळ इत्यादी अनेक उद्भवतात. पोटात उष्णता वाढल्यानंतर अपचन, ऍसिडिटी, गॅस, खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. शरीरात उष्णता वाढल्यानंतर थंड पेयांचे सेवन केले जाते. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोणते आयुर्वेदिक लेप कपाळावर लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील आणि उष्णता कमी होऊन शरीर फ्रेश राहील. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ शरीरात थंडावा टिकवून ठेवतात.(फोटो सौजन्य – AI)

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आयुर्वेदिक लेप:

पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत प्रत्येक घरात चंदनाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांसाठी केला जात आहे. चंदन, मुलतानी माती, पुदिना किंवा कोरफड यांसारखे नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ शरीरात थंडावा टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. या पदार्थांपासून बनवलेला लेप उष्णता कमी करून शरीरात थंडावा टिकवून ठेवतो. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कपाळावर चंदनाचा लेप लावावा. यासाठी वाटीमध्ये चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट कपाळावर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या.

उन्हामुळे वाढलेली डोकेदुखी, कपाळाची आग किंवा थकवा कमी करण्यासाठी मुलतानी माती खूप जास्त फायदेशीर आहे. मुलतानी मातीचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. शरीरात उष्णता वाढल्यास कपाळावर किंवा मानेवर मुलतानी मातीचा लेप लावावा. काहीवेळ ठेवल्यानंतर थंड पाण्याने लेप स्वच्छ धुवून टाका. यामुळे त्वचा सुंदर होईल आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल.

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

उष्णतेच्या त्रासापासून कायमची सुटका हवी असेल तर कोरफड जेलचा वापर करावा. कोरफडीच्या गरात चिमूटभर हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या. उन्हामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेलपासून बनवलेला लेप चेहऱ्यावर लावावा. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर काकडी उपलब्ध असतात. काकडीचा रस काढून डोळ्यांभोवती आणि डोक्यावर लावल्यास उष्णता कमी होण्यासोबतच त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होईल. तसेच वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नियमित भरपूर पाणी, ताक पिणे आवश्यक आहे. घरगुती उपाय करून सुद्धा शरीरात उष्णता जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Follow these home remedies to get permanent relief from heat build up and headaches stay fresh forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
1

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
3

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
4

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.