Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Home Remedies: मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा मास्क

Home Remedies: मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे आणि योग्य स्किन केअर रुटीन फॉलो केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात आणि मान उजळदार दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 22, 2026 | 03:20 PM
मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून बनवा मास्क

मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून बनवा मास्क

Follow Us
Follow Us:

Home Remedies: सुंदर दिसण्यासाठी कायमच चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. नेहमीच फेसवॉश, फेस सीरम, फेसपॅक इत्यादी अनेक गोष्टींचा वापर त्वचेसाठी कायमच केला जातो. पण मानेवर वाढलेल्या टॅनिंगकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. काहींचा चेहरा अतिशय उजळदार दिसतो, पण मान खूप जास्त काळी दिसू लागते. मानेवर वाढलेले टॅनिंग संपूर्ण लुक खराब करून टाकते. त्यामुळे मानेवर वाढलेल्या टॅनिंगकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. याशिवाय शरीरात होणारे हार्मोनल बदल, रक्तात वाढलेली साखर इत्यादी अनेक कारणामुळे सुद्धा मानेवर टॅनिंग वाढू शकते.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care: वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! ‘हे’ सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य

मानेच्या घड्यांमध्ये घाम, धूळ आणि मृत त्वचापेशी साचून राहिल्यामुळे त्वचा अस्वच्छ दिसू लागते. यासाठी महागड्या ट्रीटमेंट तर काहीवेळा स्किन केअरमध्ये सुद्धा बदल केला जातो. पण वारंवार महागड्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. आज आम्ही तुम्हाला मानेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सोपा मास्क बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला मास्क त्वचेवरील मृत पेशी नष्ट करण्यासोबतच त्वचा उजळदार करेल.

मानेवरील टॅनिंग घालवण्यासाठी उपाय:

मानेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सगळ्यात आधी फेसवॉश करताना मान सुद्धा स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. कारण मानेवर घामाचा किंवा धुळीचा चिकट थर जमा होऊन राहतो. अनेक महिला लिंबू, बेकिंग सोडा किंवा खडबडीत स्क्रब वापरून मानेवर वाढलेला काळेपणा कमी करतात, पण यामुळे त्वचेमध्ये जळजळ होण्याची जास्त शक्यता असते. त्वचा काळी झाल्यानंतर जास्त घासून काढल्यास त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही मास्क किंवा स्क्रब लावल्यास त्वचा घासू नये.

मानेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. अंघोळीनंतर आणि रात्री झोपण्याआधी मानेवर मॉइश्चरायझरचा वापर करावा. यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. याशिवाय त्वचा कोरडी पडू शकते. सुगंधविरहित आणि संवेदनशील त्वचेसाठी योग्य असलेले मॉइश्चरायझर निवडणे फार आवश्यक आहे. मान आणि मानेच्या मागील भागाकडे दुर्लक्ष करू नये. याशिवाय बाहेर पडण्यापूर्वी मानेवरही SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त SPF असलेले ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावावे.

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

स्कार्फ किंवा कॉलर असलेले कपडे वापरुनही मानेचे उन्हापासून संरक्षण करावे. त्वचेवर वाढलेला काळेपणा करण्यासाठी नियासिनामाइड किंवा अॅझेलाइक अॅसिड असलेली स्किन केअर प्रॉडक्ट वापरावीत. प्रॉडक्टचा वापर करताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये हळूहळू वापर करावा. त्यानंतरच नियमित प्रॉडक्ट वापरावे. कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मानेवरील टॅनिंग कशामुळे होते?

    Ans: सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यामुळे मानेच्या त्वचेवर टॅनिंग होऊ शकते. तसेच घर्षण आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यानेही त्वचेचा रंग असमान दिसू शकतो.

  • Que: मानेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?

    Ans: बेसन, दही आणि कोरफड यांसारख्या पदार्थांचा वापर करून सौम्य मास्क तयार करता येतो. मात्र, यामुळे टॅनिंग पूर्णपणे दूर होते याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

  • Que: मानेवरील काळेपणा कमी करण्यासाठी बेसनाचा वापर कसा करावा?

    Ans: बेसनात थोडे दही मिसळून पेस्ट तयार करा. ती मानेवर लावून काही मिनिटांनी पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करा. त्वचेला त्रास झाल्यास वापर थांबवा.

Web Title: Home remedies does the skin on your neck look dark due to tanning use these kitchen ingredients to prepare a mask sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • Winter Care

संबंधित बातम्या

Skin Care: वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! ‘हे’ सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य
1

Skin Care: वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! ‘हे’ सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य

Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर
2

Skincare tips: रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी? या टिप्स एकदा करा वापर

home tips: ‘तुमची कढीपत्त्याची रोपे मरू नयेत म्हणून हे आताच करा’, दाट रोपे वाढवण्याचे गुपित आणि एक मोफत उपाय
3

home tips: ‘तुमची कढीपत्त्याची रोपे मरू नयेत म्हणून हे आताच करा’, दाट रोपे वाढवण्याचे गुपित आणि एक मोफत उपाय

Sugar Free Ladoo: साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा
4

Sugar Free Ladoo: साखर गुळाचा अजिबात वापर न करता बनवा डायबिटिक फ्रेंडली डिंक-खोबऱ्याचे हेल्दी लाडू, शरीराला मिळेल ऊर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.