त्वचा घट्ट होण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय
दैनंदिन आयुष्य जगताना आरोग्याची जेवढी काळजी घेतली जाते, तितकीच काळजी त्वचेची सुद्धा घ्यावी. चेहऱ्यावर त्वचा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या पदार्थाचे सेवन केल्यानंतर किंवा त्वचेला सूट न होणारे प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही केमिकल ट्रीटमेंट करून घेतात, मात्र यामुळे त्वचेमध्ये फारसा बदल दिसून येत नाही. धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, काळे डाग येऊ लागतात. काळ्या डागांमुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. याशिवाय वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये बदल होऊ लागतात. सुरकुत्या येणे, त्वचा सैल पडणे इत्यादी बदलांना महिलांना सामोरे जावे लागते.(फोटो सौजन्य – iStock)
कोरियन ग्लास स्किनचे सिक्रेट! ट्राय करा हे DIY Masks, पहिल्या वापरतच चेहऱ्यावर दिसून येतील बदल
मात्र हल्लीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर दिसून येत आहे. कमी वयात त्वचा सैल झाल्यामुळे म्हतारपण आल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे सततच्या केमिकल ट्रीटमेंट न करता त्वचेला सूट होईल अशाच प्रॉडक्टचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला सैल झालेली त्वचा तरुण आणि चमकदार करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे त्वचेवरील तारुण्य कायम टिकून राहील आणि त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसेल.
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतात. व्यायाम केल्यामुळे शरीरावरील त्वचा घट्ट होते. तसेच त्वचेवरील स्नायूंचा विकास होतो. कमी वयात त्वचा सैल झाल्यासारखे वाटल्यास नियमित फेसयोग करणे आवश्यक आहे. यासोबत तणाव कमी करण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यान करावे.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला सतत कोणत्या ना कोणत्या क्रीम्स त्वचेवर लावत असतात. मात्र त्वचेला सूट न होणाऱ्या क्रिम्सचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा सैल झाल्यासारखी वाटू लागते. याशिवाय त्वचेचे तारुण्य कमी होते. त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी रेटिनॉल आणि हायलुरोनिक ऍसिड असणाऱ्या क्रीम्स किंवा सीरमचा वापर करावा.
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच करा फेशिअल, चेहऱ्यावर मिळवा पार्लरसारखा चमकदार ग्लो
तरुण आणि कायम सुंदर दिसण्यासाठी त्वचा हायड्रेट असणे आवश्यक आहे. त्वचेमधील ओलावा कमी झल्यानंतर पोषण कमी होऊन जाते. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. याशिवाय आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. उन्हाच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी नियमित सनस्क्रीन लावावे.